ग्रामीण भागात वीजचोरी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:26 IST2021-04-18T04:26:41+5:302021-04-18T04:26:41+5:30

-------------- मोकाट जनावरांमुळे रहदारी बाधित आष्टा : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभी राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत ...

Electricity theft increased in rural areas | ग्रामीण भागात वीजचोरी वाढली

ग्रामीण भागात वीजचोरी वाढली

--------------

मोकाट जनावरांमुळे रहदारी बाधित

आष्टा : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभी राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून, वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

------------

फवारणी न झाल्याने डासांचा प्रादुर्भाव

जत : आरोग्य विभागाच्या वतीने गावागावांत फवारणी न झाल्याने यंदा डासांचा प्रादुर्भाव अधिक वाढणार आहे. सध्या डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. जत शहरातही नाल्यांचा उपसा नियमित करण्याची मागणी होत आहे.

----------

दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करावे

कवठेमहांकाळ : केंद्र व राज्य शासनाने दिव्यांगांच्या हितासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत. मात्र, तालुक्यात योजनांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे दिव्यांग विकासापासून वंचित आहेत. प्रशासनाने दिव्यांगांचे सर्वेक्षण करून विकास योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींकडून करण्यात येत आहे.

--------------

गृहिणींचे बजेट कोलमडले

कुपवाड : महागाईचा आगडोंब उडाल्याने गरीब, कष्टकऱ्यांचे हाल झाले आहेत. कोरोनाचा नोकरी, व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यातच कडधान्य, तेलाचे भाव वाढले आहेत. खाद्यतेलाच्या दरात ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

---------------

फळ-भाजी विक्रेतेही घरात

सांगली : कोरोनाचा परिणाम सर्वच व्यवसायांवर झाला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्वच व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामध्ये छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यांना घरातच राहावे लागले आहे.

Web Title: Electricity theft increased in rural areas