शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियानावेळी अतिक्रमणे हटविली

By admin | Updated: November 20, 2014 00:24 IST

इस्लामपुरात कारवाई : व्यापारी संतप्त; वीसजणांवर गुन्हा दाखल

इस्लामपूर : शहरात नगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाच्या पार्श्वभूमीवर मोमीन मोहल्ला परिसरातील आझाद चौकात असणाऱ्या दुकानांसमोरील अतिक्रमणे जेसीबीने हटवली. यामध्ये या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. पालिकेच्या विनानोटीस मोहिमेमुळे संतप्त झालेल्या व्यापारी व त्यांच्या समर्थकांनी हे काम बंद पाडून जेसीबी चालकाला घेऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे व्यापाऱ्यांनी जेसीबी चालक व अनोळखी १५ ते २० जणांविरुध्द पोलिसांत तक्रार दिली.फैजल हमीदुल्ला पटवेकर, अफजल रियाज इबुशे व सुहेल जब्बार पठाण या तीन व्यापाऱ्यांनी ही तक्रार दिली आहे. त्यामध्ये, आज सकाळी आम्हाला कोणतीही पूर्वसूचना किंवा लेखी नोटीस न देता अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली मोठे नुकसान केले आहे. जेसीबी चालक संजय यशवंत शेवाळे (रा. वाटेगाव) यांनी जेसीबी (क्र. एमएच १0— जे— ७६७४) द्वारे हे नुकसान केले आहे. आम्ही अल्पसंख्याक कुटुंबातील असून, या व्यवसायावर आमचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. आमच्यावर प्रचंड दहशत निर्माण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.पालिकेने अचानकपणे या परिसरातील हमीदिया स्टोअर्स, न्यू जनता मेडिकल, बाँबे स्टिल या दुकानासमोरील छपऱ्या, भिंत, पायऱ्या काढण्यास सुरुवात केल्यावर तेथे मोठी गर्दी जमली. काही वेळात तेथे प्रभागातील नगरसेवक कपिल ओसवाल, विरोधी पक्षनेते विजय कुंभार, माजी नगरसेवक विक्रम पाटील, काँग्रेसचे विजय पवार, मनसेचे सनी खराडे, युवाशक्तीचे सोमनाथ फल्ले व त्यांचे कार्यकर्ते जमा झाले. या सर्वांच्या उपस्थितीने ही अतिक्रमण मोहीम थांबली.यावेळी तेथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. व्यापाऱ्यांनी ही मोहीम थांबवल्यावर जेसीबी चालकाला घेऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुयश जोशी अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)आकस्मिक कारवाईमुळे तणावपालिकेने अचानकपणे या परिसरातील हमीदिया स्टोअर्स, न्यू जनता मेडिकल, बाँबे स्टिल या दुकानासमोरील छपऱ्या, भिंत, पायऱ्या काढण्यास सुरुवात केल्यावर तेथे मोठी गर्दी जमली. व्यापारी या कारवाईने संतप्त झाले होते. काही वेळात तेथे सर्वपक्षीय कार्यकर्ते व काही नगरसेवक जमा झाले. त्यांच्या उपस्थितीने ही अतिक्रमण मोहीम थांबली. यावेळी तेथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.