शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीमुळे पाणीटंचाई

By admin | Updated: September 13, 2015 22:14 IST

आटपाडीत स्थिती गंभीर : जुन्या मोटारी जळाल्या; नव्या योजनेला वीज कंपनीचे ‘कनेक्शन’च नाही

अविनाश बाड -आटपाडी --विजेच्या कमी-जास्त दाबामुळे आटपाडीला पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या पाणी पुरवठा योजनेच्या मोटारी जळाल्या आहेत. आधीच ८ ते १० दिवसांतून एकदा मिळणाऱ्या पाण्यामुळे आटपाडीकर वैतागले असताना, वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे येथील पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे. भारत निर्माण योजनेतून तब्बल १६ कोटी ६ लाख रुपये खर्चून जलशुद्धीकरण प्रकल्पासह पाणी पुरवठ्यासाठी सज्ज असलेल्या योजनेला जुन्या पाणी योजनेच्या थकबाकीचे कारण पुढे करून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन जोडण्यास नकार दिला आहे.सध्या आटपाडी तलावाखालील विहिरीत तलावातील पाणी सोडून ८ ते १० दिवसांतून एकदा अत्यंत गढूळ आणि अस्वच्छ पाणी पुरवठा केला जात आहे. जुनाट यंत्रणेमुळे नागरिकांसह कारभाऱ्यांचेही पाण्याने हाल सुरू केले असताना, शुक्रवारी तारा तुटल्या, त्यावेळी २० अश्वशक्तीची ग्रामपंचायतीची पहिली मोटार जळाली. त्यानंतर दुसरी आणि शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास विजेच्या कमी-जास्त दाबामुळे तिसरी मोटारही जळाली. २० अश्वशक्तीच्या तिन्ही मोटारी २० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्या आटपाडीत दुरुस्त होईनात, म्हणून कारभाऱ्यांनी सांगली गाठली. त्यामुळे आटपाडीकरांवर पुन्हा पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आणली आहे.वास्तविक या मोटारी दुरुस्त झाल्या तरी आटपाडीची पाणीटंचाई दूर होऊ शकत नाही. त्यासाठी भारत निर्माण योजनेतून केलेली नवी योजना तात्काळ सुरू होण्याची गरज आहे. ही योजना सध्या आटपाडीला जलशुद्धीकरण प्रकल्पातून शुद्ध केलेले पाणी पुरवठा करण्यासाठी सज्ज आहे. आटपाडी तलावातून विहिरीसह जॅकवेल व त्यातील ४० अश्वशक्तीचे दोन पंप आणि जलशुद्धीकरण प्रकल्पातील ३५ अश्वशक्तीचे दोन पंप बसवून दोन महिने झाले. ९० आणि ५१ अश्वशक्तीचा वीजपुरवठा करण्यासाठी तिथे दोन डीपी बसवून १० दिवस झाले. आता फक्त वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या डीपीना विजेचे कनेक्शन जोडणे बाकी आहे. तलावातील पाणी सध्या पिण्यासाठी आरक्षित केल्याने आवश्यक तेवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. आटपाडी हे तालुक्याचे गाव. ग्रामस्थ पाणी-पाणी करीत असताना, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जुन्या पाणी पुरवठा योजनेची थकित वीज बाकी वसुलीची ही नामी संधी समजली आहे. आटपाडी ग्रामपंचायतीकडे ९७ लाख वीज बिल थकित असल्याचे वीज कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे, तर एवढे बिल ग्रामपंचायत प्रशासनाला मान्य नाही. वीज कंपनीची वीज बिलापोटीची जी काही वसुली असेल, ती ग्रामपंचायतीने द्यायलाच हवी. पण ३२ हजार ७८० एवढी लोकसंख्या असलेल्या आटपाडीतील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल करून वीज बिलाची वसुली परकीय इंग्रजांनी सुद्धा केली नसती. लोकांना गढूळ पाणी पिल्यामुळे पोटाचे आजार वाढत असताना, ते पाणीही आता वीज कंपनीच्या वसुलीबहाद्दर अधिकाऱ्यांमुळे मिळणे मुश्कील झाले आहे. सरकारने केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेला वीज कनेक्शन न जोडणाऱ्या वीज कंपनीच्या बेफिकीर अधिकाऱ्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.शुद्ध पाण्याची प्रतीक्षा आटपाडीतील पाणी टंचाईला वैतागून येथील काही सामाजिक संघटनांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आटपाडी पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा देऊन आंदोलकांना शांत केले. सततच्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाऊन इथल्या लोकांमध्ये कमालीची सोशिकता आली आहे. त्यामुळे जीवघेणी पाणीटंचाई निर्माण होऊनही नागरिक पावसाच्या अपेक्षेप्रमाणे ही भीषण पाणी टंचाई नष्ट होण्याची वाट मोठ्या आशेने पाहत आहेत.