शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

सांगलीत तयार झालेला रस्ता पाईपलाईनसाठी खोदला, जिल्हा सुधार समितीमार्फत संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 6:08 PM

लक्ष्मी देऊळ-ते कुपवाड रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होत आल्यानंतर पाईपलाईनसाठी तो पुन्हा खोदण्याचा प्रकार ठेकेदारामार्फत घडला. या प्रकाराबद्दल सांगली जिल्हा सुधार समितीने संताप व्यक्त करून नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी थांबविण्याची मागणी केली.

ठळक मुद्देठेकेदारामार्फत पाईपलाईनसाठी रस्ता पुन्हा खोदण्याचा प्रकार सुधार समितीने दिली तातडीने भेट, केली पाहणी

सांगली : लक्ष्मी देऊळ-ते कुपवाड रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होत आल्यानंतर पाईपलाईनसाठी तो पुन्हा खोदण्याचा प्रकार ठेकेदारामार्फत घडला. या प्रकाराबद्दल जिल्हा सुधार समितीने संताप व्यक्त करून नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी थांबविण्याची मागणी केली.सांगली-कुपवाड रस्त्यावर लक्ष्मी देऊळ परिसरात रस्त्याचे काम बीबीएम स्तरापर्यंत आले आहे. पूर्णत्वास आलेला हा रस्ता अचानक जेसीबीने उकरण्यास सरुवात केल्यानंतर त्याबाबतची माहिती नागरिकांनी जिल्हा सुधार समितीला दिली.

सुधार समितीचे अ‍ॅड.अमित शिंदे यांनी तातडीने याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. शिंदे म्हणाले की, गटारीचे आणि रस्त्याचे काम एकाच ठेकेदाराकडे आहे. तरीही या कामातील गाफिलपणा आणि बेजबाबदारपणा दिसून येतो. सुधार समितीनेच या खराब रस्त्याकडे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी खड्ड्यांभोवती रांगोळी काढण्याचे अभिनव आंदोलन केले होते. त्याची दखल घेत या रस्त्याचे काम सुरू झाले होते.स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी केवळ हद्दीचे कारण सांगून हे काम करीत नव्हते. अखेर आंदोलनामुळे हे काम मार्गी लागले. काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर ठेकेदाराला गटारीसाठी पाईपलाईन घातली नसल्याचा साक्षात्कार झाला. त्याने तयार झालेला रस्ता पुन्हा जेसीबीने खोदण्याचा प्रकार सुरू केला.

हा सर्व प्रकार नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करण्यासारखा आहे. त्यामुळे याबाबत ठेकेदाराला जाब विचारणे आवश्यक आहे. आधीच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला असताना आता पुन्हा खोदाई करून खर्चात भर टाकण्याचा उद्योग सुरू आहे.

पाईपखाली कोणतेही बेडिंग नसल्याने हा रस्ता कालांतराने पुन्हा खचण्याची चिन्हे आहेत, असे शिंदे म्हणाले. यावेळी शिंदे यांच्यासोबत रवींद्र शिंदे, शकील शेख, अंकुर तारळेकर, सचिन चोपडे, स्वप्नील खोत, यासीन मुलाणी, महालिंग हेगडे, तानाजी रुईकर, महेश हरमलकर, संतोष शिंदे, आसिफ मुजावर उपस्थित होते.असे प्रकार खपवून घेणार नाही!यापूर्वीही रस्ते तयार झाल्यानंतर त्याठिकाणी विविध कामांसाठी पुन्हा खोदकाम केल्याच्या घटना घडल्या आहेत. शासनाच्या म्हणजेच नागरिकांच्या पैशाचा हा दुरुपयोग गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. यापुढे आम्ही असे प्रकार खपवून घेणार नाही. तयार झालेल्या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदार व संबंधित यंत्रणांनी चोखपणे सांभाळली पाहिजे, असे शिंदे म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीroad safetyरस्ते सुरक्षा