वाशिम : शिवसंग्रामच्यावतीने भर जहाँगीर येथे रास्ता रोको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 05:27 PM2018-01-18T17:27:06+5:302018-01-18T17:28:59+5:30

भर जहॉगीर (वाशिम) : हळद पिकाला एकरी २५ हजार रुपये द्यावे, कुºहा ३३ केव्ही उपकेंद्राचे काम त्वरीत सुरू करावे, खरिप व रब्बीचा पिका विमा देण्यात यावा, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसंग्राम पक्षातर्फे भर जहॉगीर बसस्थानकावर १८ जानेवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Washim: Stop the road in Jahangir, thanks to Shiv Sangram! | वाशिम : शिवसंग्रामच्यावतीने भर जहाँगीर येथे रास्ता रोको!

वाशिम : शिवसंग्रामच्यावतीने भर जहाँगीर येथे रास्ता रोको!

Next
ठळक मुद्देविविध मागण्यांसह पिक विमा देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भर जहॉगीर (वाशिम) : हळद पिकाला एकरी २५ हजार रुपये द्यावे, कु-हा ३३ केव्ही उपकेंद्राचे काम त्वरीत सुरू करावे, खरिप व रब्बीचा पिका विमा देण्यात यावा, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसंग्राम पक्षातर्फे भर जहॉगीर बसस्थानकावर १८ जानेवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
चिंचाबाभर, भर जहॉगीर सर्कलमध्ये सन २०१७ वर्षे समाधानकारक राहिले नाही.  रब्बी हंगामातील हळद पिक शेतक-यांच्या हातून गेले आहे. कुºहा ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र अद्यापही सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकºयांना सिंचनात व्यत्यय निर्माण झाला. सन २०१७-१८ या वर्षात पाऊस कमी झाला. त्यामुळे शेतमालाच्या उत्पादनातही प्रचंड घट आली. त्यामुळे शेतकºयांना पिक विम्याचा लाभ देण्यात यावा तसेच हळद पिकाला एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, कुºहा येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्र सुरू करण्यात यावे यासह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात गुरूवारी रास्ता रोेको आंदोलन करण्यात आले. यावेळी विष्णूपंत भुतेकर यांनी शेतकºयांच्या मागण्या शासनाने तातडीने मान्य करून शेतकºयांना लाभ द्यावा, अशी मागणी केली. यावेळी शेषराव खरात, आर.बी.खडसे,  महादेवराव क्षिरसागर, विजय गाडे, डॉ.जितेंद्र गवळी, बºयाच मान्यवरांना सरकारवर कडाडून टिका केली.  तहसीलदार राजू सुरडकर यांना निवेदन देण्यात आले.
रास्तारोको दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागली होती. यावेळी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. जवळपास दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अरुण चोपडे, गोपाल काळबांडे, गोपाल मुरकुटे,  जगन्नाथ गरकळ,  घनशाम मापारी, रविंद्र  चोपडे, श्रीरंग नागरे यांना ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले. यावेळी जितेंद्र गवळी, नामदेवराव सानप, भगवान चोपडे, सिध्देश्वर ठाकुर, डॉ.सुरेश गरकळ, तुळशिराम गरकळ, अर्जुन गीते, गजानन कोरकते, डॉ.पांडे, अरुण आकमार, प्रकाश लोखंडे, दिपकराव सानप, गणेश जायभाये, गंगाधर काष्टे,  परमेश्वर चोपडे, जगन चोपडे, भानुदास कोकाटे, तान्हाजी ठाकरे, राजेश कांबळे, रवि अढाव, सिताराम अढाव, शाम चोपडे, शेकडो शेतकरी उपस्थित होते.
 

Web Title: Washim: Stop the road in Jahangir, thanks to Shiv Sangram!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.