पुणे शहरातील रस्त्यांची पुन्हा चाळण होणार; रिलायन्स जीओला रस्ते खोदाईची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 04:17 PM2018-02-05T16:17:41+5:302018-02-05T16:25:20+5:30

महापालिकेच्या पथ विभागाच्या वतीने रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीला शहरात ब्रॉडबँड व मोबाईल सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक केबल टाकण्यासाठी तब्बल १५३ किलो मिटर रस्ते खोदाईसाठी नुकतीच परवानगी दिली आहे.

Roads of Pune city will be bolter; Reliance Gio permission to dig the roads | पुणे शहरातील रस्त्यांची पुन्हा चाळण होणार; रिलायन्स जीओला रस्ते खोदाईची परवानगी

पुणे शहरातील रस्त्यांची पुन्हा चाळण होणार; रिलायन्स जीओला रस्ते खोदाईची परवानगी

Next
ठळक मुद्दे१५३ किलो मिटरचे रस्ते खोदाईसाठी पालिकेच्या पथ विभागाने रिलायन्स जीओला दिली परवनागीपरवानगी मिळाल्याने खोदाईचे सर्व नियम धाब्यावर बसवून संबंधित ठेकेदारांकडून रस्ते खोदाई सुरु

पुणे : महापालिकेच्या पथ विभागाच्या वतीने रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीला शहरात ब्रॉडबँड व मोबाईल सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक केबल टाकण्यासाठी तब्बल १५३ किलो मिटर रस्ते खोदाईसाठी नुकतीच परवानगी दिली आहे. सध्या मार्च अखेरमुळे निधी खर्च करण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु आहेत. परंतु आता रिलायन्स जीओला रस्ते खोदाईसाठी परवानगी दिल्याने शहरातील रस्त्यांची प्रामुख्याने नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची देखील चाळण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या शहरामध्ये विविध विकास कामांच्या नावाखाली वेगवेवळ्या कारणांसाठी रस्ते खोदाई, दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. शहरात कोणत्याही कारणांसाठी रस्ते खोदाई करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असते. रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीने शहरात ब्रॉडबँड व मोबाईल सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक असलेली केबल टाकण्यासाठी महापालिकेकडे पारवनागी मागितली होती. त्यानुसार महापालिकेच्या पथ विभागाने दोन टप्प्यात रिलायन्स जीओला शहरात सुमारे १५३ किलो मिटरचे रस्ते खोदाईसाठी परवनागी दिली आहे. ही परवानगी देताना संबंधित कंपनीकडून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला १६९ कोटी रुपयांचा निधी महापालिकेकडे जमा देखील केला आहे. यामुळे सध्या रिलायसन्स जीओ कंपनीकडून शहरात मोठ्या प्रमाणत रस्ते खोदाई सुरु आहे.
महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये आपल्या प्रभागासाठी मंजूर झालेला निधी मार्च अखेरपूर्वी खर्च करण्यासाठी शहरामध्ये बहुतेक सर्वच नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये रस्त्यांची कामे सुरु आहेत. काही ठिकाणी डांबरी रस्ता खरवडून सिमेंट रस्ते बनविण्यात येत आहेत. तर काही ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. यामुळे गेल्या एक-दीड महिन्यांपासून शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी सुरु आहे. यामध्ये महापालिकेच्या दोन विभागांमध्ये ताळमेळ नसल्याने नवीन रस्ता तयार झाल्यानंतर पुन्हा केबल टाकण्यासाठी तो खोदला जातो. त्यात रिलायन्सला कायद्यानुसार परवानगी मिळाल्याने खोदाईचे सर्व नियम धाब्यावर बसवून संबंधित ठेकेदारांकडून रस्ते खोदाई सुरु आहे.
रिलायन्य जीओमार्फत खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम महापालिकेच्या वतीने करण्यात येते. परंतु सध्या शहरात नव्याने तयार होणाऱ्या रस्त्यांची कामांच्या संख्याच इतकी प्रचंड आहे, की रिलायन्स कंपनीने खोदलेला रस्ता पूर्ववत करण्यासाठी महापालिका प्रशासनाला किमान एक ते दीड महिन्याचा आवधी लागत आहे. यामुळे सध्या पुणेकर नगरसेविकांची विकास कामे आणि रिलायन्स जीओची रस्ते खोदाईमुळे हैराण झाले आहेत.

Web Title: Roads of Pune city will be bolter; Reliance Gio permission to dig the roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.