शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अधिष्ठातांचाच नव्या ओपीडीला ‘रेड सिग्नल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2015 22:51 IST

शासनास पत्र : मिरजेसाठी निधीचा ओढा; आमदारांचे प्रयत्न निष्फळ; मंगळवारी मुंबईत बैठक

सचिन लाड - सांगली  येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात नवीन ओपीडी बांधण्यास खुद्द अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर यांनीच ‘रेड सिग्नल’ दिला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांनी सांगलीत नव्या ओपीडीची गरज नसून, मिरजेच्या रुग्णालयाचा आणखी विस्तार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. दुसरीकडे सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचे ओपीडीसाठीचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. नवीन ओपीडी बांधण्यासाठी तत्कालीन आघाडी सरकारने १७ कोटींचा निधी मंजूर केला. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्गही झाला आहे. या गोष्टीला आता तीन वर्षे होऊन गेली, तरी बांधकामाचा श्रीगणेशा झाला नाही. त्यामुळे गेल्या महिन्यात आ. गाडगीळ यांनी रुग्णालयास भेट दिली होती. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या अधिकाऱ्यांनी लवकरच बांधकाम सुरू केले जाईल, असे सांगितले. डोणगावकरही बैठकीस उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी या विषयावर काहीच भाष्य केले नाही. रुग्णालयाची मोकळी जागा व शासनाने मंजूर केलेला निधी पडून आहे. तरीही बांधकाम का सुरू केले जात नाही. चारशे खाटांचे हे रुग्णालय मिरजेपेक्षा मोठे आहे. मिरजेच्या तुलनेत येथे सुविधांचा अभाव आहे. या रुग्णालयाचा विस्तार करण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत, पण सांगली-मिरज असा वाद निर्माण करून सर्वकाही मिरजेलाच पाहिजे, अशी भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे रुग्णालयात सुविधांचा अभाव तसेच परिसरात घाणीचे साम्राज्य आहे.पत्रातील विसंगतीमुळे बैठकआ. गाडगीळ यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी पत्रव्यवहार करून ओपीडीसह अन्य सुविधांची गरज असल्याचे कळविले आहे, तर डोणगावकर यांनीही पत्र्यव्यवहार करून ओपीडीचा व रुग्णालयाचा विस्तार करण्याची गरज नाही. मंजूर केलेला निधी रद्द करावा, असे सांगितले आहे. या दोघांच्या पत्रातील माहिती विसंगती करणारी आहे. त्यामुळे तावडे यांनी याप्रश्नी १५ सप्टेंबरला मुंबईत बैठक बोलाविली आहे. ओपीडीत काय असणार? सध्या रुग्णालयाच्या आवारात पार्किंग असलेल्या जागेवर नवीन ओपीडी बांधण्याचा प्रस्ताव आहे. नव्या ओपीडीमध्ये अत्याधुनिक एक्स-रे, सिटीस्कॅन, एमआरआय, रक्तपेढी असे सुसज्ज विभाग असणार आहेत. बर्न विभाग, रक्तपेढी व संसर्गजन्य विभागाचे विस्तारिकरण केले जाणार आहे. यासाठी शासनाने १७ कोटींचा निधी दिला आहे. ओपीडी व विस्तारिकरण करू नये, असे मी शासनाला लेखी पत्राद्वारे कळविले नाही. शासनाने सांगलीच्या रुग्णालयासाठी एक रुपयाही दिलेला नाही. १७ कोटींचा निधी मिरज रुग्णालयासाठी मंजूर केलेला आहे. सांगलीच्या रुग्णालयाचे विस्तारिकरण किंवा ओपीडी बांधायची असेल, तर शासनाने स्वतंत्र निधी मंजूर करावा. आमचा पैसा सांगलीसाठी वापरू देणार नाही. मिरजेसाठी निधी मंजूर केला असताना लोकप्रतिनिधी सांगलीसाठीच हा निधी असल्याचा गाजावाजा करीत आहेत. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून आलेला हा निधी पडून आहे, ही शोकांतिका म्हणावी लागेल. - डॉ. दीप्ती डोणगावकर, अधिष्ठाता, शासकीय रुग्णालय, सांगली