शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ड्रेनेज मुदत वाढीवर पुन्हा संघर्ष पेटणार

By admin | Updated: December 21, 2015 00:54 IST

ठरावाचा संभ्रम : काम बंदमुळे नुकसान

सांगली : महापालिकेच्या ड्रेनेज ठेकेदाराला दिलेली मुदतवाढ व बिल देण्यावरून महापौर विवेक कांबळे व स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांच्यातील वाद मिटलेला नाही. शनिवारी महासभेत बिल न देण्याचा प्रस्ताव एक (ज) खाली आणला होता. महापौरांनी सभा गुंडाळताना सर्व विषय मंजूर झाल्याचे सांगितले. त्यामुळे ठेकेदाराला बिल व मुदतवाढ न देण्याचा ठरावही मंजूर झाल्याचा दावा त्यांच्या गटातून केला जात आहे. तसेच ड्रेनेजवर चर्चा न झाल्याने हा विषय संपला, असे पाटील समर्थकांना वाटते. आता महासभेचा नेमका ठराव काय लिहिला जाणार, यावर ड्रेनेजचे भवितव्य अवलंबून आहे. ड्रेनेज ठेकेदाराला मुदतवाढ देण्याचा अधिकार महासभेचा की स्थायी समितीचा, यावरून गेले पंधरा दिवस महापालिकेत कलगीतुरा रंगला होता. त्यात स्थायी समितीने ठेकेदाराला मुदतवाढ देण्याचा ठराव केला. त्याला महापौर विवेक कांबळे व दबाव गटाने विरोध दर्शवित आयुक्तांकडे धाव घेतली. शनिवारच्या महासभेत स्वाभिमानी आघाडीच्या स्वरदा केळकर व बाळू गोंधळी यांनी एक (ज) खाली ठेकेदाराला मुदतवाढ देऊ नये, त्याचे बिलही देऊ नये, ठेकेदाराने मुख्य ट्रंकलाईनचे काम पूर्ण केलेले नाही, असा प्रस्ताव दिला. महापौरांनी हा विषय अजेंड्यावर घेतला होता. पण सभेत वित्त आयोगाच्या निधीवरूनच गोंधळ झाल्याने इतर विषयांवर चर्चा होऊ शकली नाही. सभा संपल्यावर रस्ते प्रकल्प वगळता इतर सर्वच विषय मंजूर झाल्याचे महापौरांनी जाहीर केले. त्याचाच अर्थ ठेकेदाराला मुदतवाढ व बिल न देण्याचाही ठराव मंजूर झाला, असाच होता. तसा दावा महापौर गटाकडून केला जात आहे. तसेच महासभेत ड्रेनेजवर चर्चाच न झाल्याने, आता कोणती अडचण नाही, असे सभापती पाटील समर्थकांचे म्हणणे आहे. पण महासभेचा ठराव नेमका काय झाला, हे अजून स्पष्ट झालेले नाही. येत्या आठवड्याभरात ड्रेनेजचा ठराव लिहिला जाईल, तेव्हा महासभेच्या विषयपत्राप्रमाणे तो मंजूर झाला, तर ठेकेदाराचे बिल अडकणार आहे. (प्रतिनिधी)काय होणार? सांगली व मिरजेतील मुख्य ट्रंकलाईनचे काम न करता ठेकेदाराने गल्ली-बोळात वाहिन्या टाकल्या आहेत. त्यावर महापौर विवेक कांबळे यांनी सांगली व मिरजेतील ड्रेनेजचे काम बंद पाडले होते. त्यात त्याचा मुदतवाढीचा व बिलाचा प्रश्न अधांतरी आहे. त्यामुळे ठेकेदार पुढील काम सुरू करणार, की पुन्हा काम लटकणार, याचीच चर्चा सुरू आहे. काम बंद पडल्यास ड्रेनेज योजनेचा बोजा महापालिकेवरच पडणार आहे.