शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. माधव मुतालिक यांचे निधन; संगीत, साहित्य आणि वैद्यकीय क्षेत्रात होती प्रभावी कामगिरी 

By संतोष भिसे | Updated: June 12, 2025 19:44 IST

संतोष भिसे  सांगली : 'भूले बिसरे गीत', 'इथे गाणी भेटतात' असे एका पेक्षा एक सरस हिंदी व मराठी चित्रपट ...

संतोष भिसे सांगली : 'भूले बिसरे गीत', 'इथे गाणी भेटतात' असे एका पेक्षा एक सरस हिंदी व मराठी चित्रपट गीतांचे कार्यक्रम निर्माण करून ते संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय करणारे 'सप्तक सारेगम' या संस्थेचे एक संस्थापक सदस्य, ज्येष्ठ निवेदक आणि वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या नावाची मोहोर उमटवणारे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक डॉ. माधव मुतालिक यांचे श्वसनविकाराने भोपाळ येथे गुरुवार दि.१२जून २०२५ रोजी पहाटे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले.मिरज वैद्यकीय महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून काही काळ काम केल्यानंतर, बुधगाव येथील वसंतदादा दंत महाविद्यालय, पुणे येथील  डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज त्याचबरोबर मॉरिशस मधील सेशल्स येथील वैद्यकीय इन्स्टिट्यूट मध्ये  ज्ञानदानाची प्रभावी कामगिरी करत डॉ. माधव मुतालिक यांनी अनेक विद्यार्थी घडविले होते. सध्या ते भोपाळ येथील रामकृष्ण मेडिकल कॉलेज मध्ये विभागप्रमुख म्हणून  कार्यरत होते. 'माझे तसे ठीक चालले आहे'हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित होता. याच नावाने त्यांच्या स्वतःच्या कवितांच्या वाचनाचा एक स्वतंत्र कार्यक्रम डॉ.माधव मुतालिक व त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता मुतालिक अतिशय प्रभावीपणे सादर करत असत. जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर तसेच मराठी भावगीतांच्या कार्यक्रमांचे अतिशय ओघवत्या भाषेत, प्रभावी  निवेदन करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई असा परिवार आहे.