शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीवरून तू तू-मै मै

By admin | Updated: September 16, 2014 23:55 IST

कासेगावात प्रकार : सत्ताधारी-विरोधक भिडले

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील दारूबंदी ठरावाबाबत विरोधक व सत्ताधारी गटात सध्या तू- तू मै-मै सुरु आहे. ठरावासाठी विरोधी गट आग्रही असून सत्ताधारी प्रतिसाद देत नसल्याची त्यांची तक्रार आहे. सरपंच सौ. नंदाताई पाटील यांची दारूबंदी ठरावाबाबतची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात असल्याने ग्रामस्थांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.कासेगावात काही दिवसांपासून दारूबंदीबाबत आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापले आहे. सरपंच सौ. नंदाताई पाटील यांनी केलेल्या आरोपांना विरोधकांनीही तितक्याच आक्रमकपणे उत्तरे दिली आहेत. विरोधकांनी दारूबंदीबाबत घेतलेली आग्रही गावातील समस्यांबाबत घेतलेल्या संघर्षाच्या पवित्र्याची ग्रामस्थांत चर्चा सुरु आहे.राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या या गावात दारुबंदीबाबत विरोधी गटाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. वेळोवेळी यावर ग्रामसभांमधून गरमागरम चर्चा झाल्या आहेत. सत्ताधारी गटही दारुबंदीसाठी अनुकूलता दाखवत असला तरी, चर्चेपलीकडे यावर ठोस निर्णय मात्र त्यांना घेता आलेला नाही. त्यामुळे लोकांत नाराजी असून याचाच फायदा घेणे विरोधी गटाकडून सुरु आहे. त्यामुळे अगदी गनिमीकाव्याने त्यांचे दारुबंदीचे काम सुरु आहे. सत्ताधारी गट मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे विरोधकांचा ‘एकला चलो रे’ असा कार्यक्रम सुरु आहे. विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर असल्याने विरोधकांनी मात्र प्रचाराआधीच गावातील राजकीय वातावरण तापवले आहे. (वार्ताहर)सत्ताधारी गट गेल्या कित्येक वर्षांपासून दारूबंदी ठरावाबाबत चालढकल करत आहे. दारूबंदीअगोदर समाजाचे प्रबोधन करायचे, असा फक्त उपदेशच त्यांच्याकडून सुरु असून, आतापर्यंत त्यांनी किती समाजप्रबोधन केले, किती व्याख्याने आयोजित केली, याचे उत्तर त्यांनी द्यावे. त्यांच्याकडूनच राजकीय फार्स सुरु असून, विरोधक दारुबंदी केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.- भिकशेठ तोडकर, संचालक, शिवाजी केन प्रोसेसर्स, शिराळा.