शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडमधील जि. प. शाळेसमोरील खोकीधारकांना नोटिसा

By admin | Updated: April 28, 2015 00:31 IST

खोकीधारकांत नाराजी : शाळेसमोरील अतिक्रमणे तात्काळ काढून घेण्याचे आदेश

कुपवाड : येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात अतिक्रमण केलेल्या ३८ खोकीधारकांना पंचायत समितीकडून कारवाईच्या नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या खोकीधारकांनी तात्काळ आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमणे काढून टाकली जातील, असा इशारा नोटिसीद्वारे त्यांना देण्यात आला आहे. कुपवाड विकास सोसायटी चौकातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक, उर्दू शाळा आणि शाळा क्रमांक दोनच्या जागेवर एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शहरातील ३८ खोकीधारकांकडून व्यवसायासाठी खोकी बसविण्यात आली आहेत. गेल्या वीस वर्षांपासून याठिकाणी या खोकीधारकांचा व्यवसाय सुरू आहे. २००५ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यामुळे शहर सुशोभिकरणाच्या नावाखाली महापालिकेने शहरातील खोकीधारकांवर कारवाई केली. प्रशासनाने त्यांच्याकडून खोकी पुनर्वसनासाठी रकमा घेतल्या. त्यातील काहीजणांना महापालिकेच्या मिरज रस्त्यावरील पाण्याच्या टाकीच्या चौकात गाळेही देण्यात आले. काहींनी गाळे घेतले, काहींना गाळे मिळाले नाहीत. त्यामुळे खोकी याठिकाणी पुन्हा ठेवण्यात आली. पूर्वी रस्त्यावर महापालिकेच्या जागेत असलेली खोकी नंतर जिल्हा परिषद शाळेच्या आवारात ठेवण्यात आली. त्यामुळे महापालिकेकडून हा प्रश्न जिल्हा परिषदेकडे गेला. जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष आणि खोकी संघटनेचे पदाधिकारी यांनी खोकी पुनर्वसनाबाबत तीन वर्षापूर्वी बैठकाही घेतल्या. परंतु, त्यावेळी हा प्रश्न सुटला नाही. अखेर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेऊन तिन्ही शाळांच्या आवारातील ३८ खोकीधारकांना कारवाईच्या नोटिसा दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या खोकीधारकांनी तात्काळ आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमणे काढून टाकली जातील, असा इशारा गटशिक्षणाधिकारी यांनी खोकीधारकांना नोटिसीद्वारे दिला आहे. ही खोकी तात्काळ काढून न टाकल्यास पोलीस बंदोबस्तात ही खोकी काढली जातील. नुकसान झाल्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी नोटिसीत नमूद केले आहे. त्यामुळे सध्याच्या मंदीच्या युगात या खोक्यांमधून व्यवसाय करून आपला संसार करणाऱ्या खोकीधारकांमध्ये या नोटिसीमुळे नाराजी पसरली आहे. जिल्हा परिषद किंवा महापालिकेने खोक्यांचे त्वरित पुनर्वसन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (वार्ताहर)महापालिकेकडून चालढकल..२००५ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती सांगलीच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शहरातील खोकीधारकांना पुनर्वसनाचे आश्वासन तत्कालीन काँगे्रस पदाधिकाऱ्यांनी दिले होते. आता त्यांचीच सत्ता महापालिकेत आहे. तरीही त्यांच्याकडून या खोकीधारकांचे पुनर्वसन केले जात नाही. खोकीधारकांना पोकळ आश्वासने देऊन चालढकल केली जात आहे. याबद्दल खोकीधारकांत नाराजी आहे. जिल्हा परिषदेने तरी खोकीधारकांना गाळे देऊन पुनर्वसन करावे, अशी मागणी काही खोकीधारकांकडून करण्यात आली आहे.