शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियातून थेट शिराळ्याला! 'एक मत' महत्त्वाचं म्हणत युवकाने बजावला मतदानाचा हक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 21:01 IST

शिराळा नगरपंचायत निवडणूक: मताधिकार बजावण्यासाठी उच्चशिक्षण घेणारा अन्सार मुल्ला परदेशातून दाखल

विकास शहा, लोकमत न्यूज नेटवर्क, शिराळा: शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या  रणधुमाळीत आता एक-एक मत किती महत्त्वाचे आहे, हे दर्शवणारा एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्शवत प्रसंग समोर आला आहे. अनेक मतदार घरात असूनही 'आपल्या एका मताने काय फरक पडतो?' असे म्हणून मतदानाकडे पाठ फिरवतात. मात्र, या सगळ्यांसाठी शिराळ्यातील युवकाने नवा आदर्श घालून दिला आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये नोकरीस असणारे मास्टर ऑफ मेकॅनिकल असे उच्च शिक्षित असणारे शिराळ्याचे अन्सार कासम मुल्ला हे विशेषतः नगरपंचायत निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थेट ऑस्ट्रेलियातून शिराळ्याला दाखल झाले आहेत.अनेक मतदार घरामध्ये असूनही मतदान करत नाहीत. याचे कारणही ते सांगताना आपल्या एका मताने काय फरक पडतो हे वाक्य ऐकवतात.प्रशासन 'सर्व मतदारांनी मतदान करावे' यासाठी विविध उपक्रम राबवत असताना, अन्सार मुल्ला यांनी दाखवलेला हा उत्साह आणि मताधिकाराबद्दलची जाणीव खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांचे हे पाऊल, मतदानाचे महत्त्व आणि लोकशाहीवरील दृढ विश्वास अधोरेखित करते.

अन्सार मुल्ला यांचे शिराळा येथे आगमन होताच त्यांच्या कुटुंबीय आणि मित्र परिवाराने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. या प्रसंगी फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंदी वातावरण निर्माण झाले होते.यावेळी माजी उपसरपंच सुनील कवठेकर, महेश खंडागळे, हिदायत मुल्ला, मेहबूब मुल्ला, निसार मुल्ला, सरोज मुल्ला, सइफ मुल्ला, संजय हिरवडेकर यांच्यासह मित्र परिवार तसेच घरातील सदस्य उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Australia to Shirala: Youth flies home to vote, valuing democracy.

Web Summary : Ansar Mulla, an engineer working in Australia, traveled to Shirala to vote in the Nagar Panchayat elections, inspiring others. He emphasized the importance of every vote, countering the apathy of those who believe their vote doesn't matter. His dedication highlights the significance of civic duty.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकSangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूकSangliसांगली