शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मार्केट यार्डात डिजिटलचा बाजार

By admin | Updated: July 31, 2015 01:11 IST

बाजार समिती निवडणूक : उमेदवारांमध्ये पोस्टर युद्ध; व्यापाऱ्यांच्या दारी नेत्यांची बारी

अंजर अथणीकर / सांगली सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्यानिमित्ताने येथील मार्केट यार्डमध्ये डिजिटल्सचा बाजार झाला आहे. प्रत्येक गल्ल्या, दुकाने उमेदवारांच्या डिजिटलनी झाकोळली आहेत. रिक्षामधूनही ध्वनिक्षेपकाद्वारे जोरदार प्रचार सुरु आहे. त्यामुळे बाजार समितीचा प्रचार सुरुवातीलाच शिगेला पोहोचल्यासारखे दिसत आहे. उमेदवारांच्या गाठीभेटीने सभासद व्यापारी वैतागल्याचे चित्र सध्या दिसत आहे. व्यापारी प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी १३ उमेदवार, तर हमाल-तोलाईदारमधून एका जागेसाठी ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बाजार समितीच्या इतिहासात तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असण्याची ही पहिलीच वेळ आहे. निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये चेंबर आॅफ कॉमर्सला अपयश आले. निवडणुकीच्या रिंगणात चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष नितीन पाटील, आर. टी. कुंभार, विवेक शेटे, अशोक पाटील, सुनील पट्टणशेट्टी, अभय मगदूम, मुजीर जांभळीकर, शीतल पाटील, मोहन माने, विकास मोहिते, महेंद्र तोष्णिवाल आदी तेरा उमेदवार आहेत. त्याचबरोबर हमाल तोलाईदारच्या एका जागेसाठी पाच जण रिंगणात आहेत. व्यापारी प्रतिनिधीसाठी सुमारे तेराशे मतदार असून, यामधील हजार मतदार हे केवळ मार्केट यार्डमध्ये आहेत. जत, कवठेमहांकाळ, मिरज व विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये तीनशे मतदार आहेत. तीन तालुके फिरण्यापेक्षा सर्वांनी सध्या मार्केट यार्डमध्येच लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक उमेदवाराने प्रत्येकी चार ते पाच डिजिटल मार्केट यार्डमध्ये उभी केल्याने संपूर्ण मार्केट यार्ड परिसर डिजिटलनी झाकोळला आहे. चार दिवसांपूर्वी महापालिकेने मोहीम उघडून सर्व डिजिटल हटविली होती. आता उमेदवारांनी बाजार समिती व महापालिकेची रितसर परवानगी काढून पुन्हा डिजिटल उभारल्यामुळे वाहतुकीसही अडथळा होत आहे. तेराही उमेदवार सकाळपासून सायंकाळपर्यंत व्यापारी मतदारांच्या दुकानांमध्ये जाऊन गाठीभेटी घेत आहेत. काहींनी घरोघरीही गाठीभेटी सुरु केल्याने, अनेक व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही ज्येष्ठ व्यापाऱ्यांनी सध्या अनुपस्थित राहणेच पसंत केले आहे. उमेदवारांनी देवदर्शनासाठी देवस्थानच्याही वाऱ्या वाढविल्या आहेत. हमाल तोलाईदार मतदार संघातील उमेदवारांनी डिजिटल तर उभारली आहेतच, शिवाय रिक्षातून ध्वनिक्षेपकाद्वारेही प्रचार सुरु केला आहे. मार्केट यार्डमध्ये बाळासाहेब बंडगर, गजानन शिंदे, संभाजी सलगर आदींनी हमाल तोलाईदार मतदार संघात प्रचार सुरु केला आहे.