शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल-ताशे

By admin | Updated: March 11, 2015 00:04 IST

महापालिकेची कारवाई : दिवसभरात ३५ लाखांची घरपट्टी वसूल

सांगली : महापालिकेच्या घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी आज, मंगळवारपासून थकितांच्या घरासमोर ढोल-ताशे वाजविण्यात आले. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरात वाजंत्रीच्या पाच पथकांद्वारे वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दिवसभर या पथकांनी याद्वारे साडेसहा लाखांची वसुली केली, तर एकूण ३५ लाखांची थकबाकी वसूल झाली आहे. ही मोहीम आणखी तीव्र करणार असल्याचे करनिर्धारक व संकलक सुनील नाईक यांनी सांगितले.
महापालिकेच्या घरपट्टीची ५० कोटीपेक्षा अधिक थकबाकी आहे. वारंवार नोटिसा बजावूनही कर वसुलीला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. दरवर्षी थकबाकीचा आकडा वाढतच जात आहे. थकबाकी वसुलीसाठी वाजंत्री वाजविण्याचे आदेश महापौर विवेक कांबळे यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनाने आजपासून ही कारवाई सुरू केली. तीन शहरात पाच पथके तयार करण्यात आली आहेत. त्यात सांगलीत दोन, मिरजेत दोन व कुपवाडला एका पथकाद्वारे वसुली सुरू केली. थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल-ताशे वाजविण्यात आले. सांगलीतील शंभरफुटी, शामरावनगर, रतनशीनगर, जामवाडी परिसरात वसुली मोहीम राबविण्यात आली.
पालिकेचे पथक वाजंत्रीसह दारात येताच थकबाकीदारांकडून विनवण्या होत होत्या. दारात ढोल-ताशे वाजवू नका, आम्ही कर भरतो, असा प्रतिसादही मिळत होता. सांगलीतील पथकाकडून दिवसभरात २० थकबाकीदारांकडून सहा लाख ६६ हजाराची वसुली झाली. दिवसभरात ३० लाख ८४ हजारांची घरपट्टी वसूल झाली. त्यात सांगलीतून २२.५६ लाख, मिरजेतून ७ लाख, तर कुपवाडमधील १.१९ लाख रुपयांचा समावेश आहे. (वार्ताहर)

२ हजार जणांना नोटिसा
महापालिकेने दहा हजारपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांवर लक्ष केंद्रित केले आहे. तीनही शहरातील दहा हजारापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या दोन हजार मालमत्ताधारकांना नोटिसा बजाविल्या आहेत. पहिल्या टप्प्यात या मालमत्ताधारकांच्या दारात ढोल-ताशे वाजविले जाणार आहेत. त्याशिवाय पाणी कनेक्शन तोडण्याची कारवाईही हाती घेतली आहे. आज, मंगळवारी दोन पाणी कनेक्शन्स तोडण्यात आली.