शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

मिरज-पंढरपूर मार्गावर धूम टोळीचा धुमाकूळ

By admin | Updated: September 19, 2015 23:59 IST

पोलीस असल्याचा बनाव : मारहाण करून तिघांना लुटले

मिरज : मिरज-पंढरपूर महामार्गावर चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घालत पोलीस असल्याचा बनाव करून वेगवेगळ्या ठिकाणी तिघांना मारहाण करून सुमारे ५० हजारांचा ऐवज लुटला. पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने चोरट्यांचा पाठलाग केल्याने म्हैसाळ येथे दुचाकी टाकून चोरटे कागवाडच्या दिशेने पळून गेले. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी रात्री एकाच दुचाकीवरून आलेल्या चार चोरट्यांनी तानंग फाट्यावर भास्कर पाडुरंग माळी (वय ५५, रा. विसापूर, ता. तासगाव) यांना अडविले. माळी यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील १६३० रुपयांची रोख रक्कम, अडीच हजार रुपये किमतीचा मोबाईल व त्यांची स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच १० बीइ ७४७२) काढून घेतली. चोरटे माळी यांची दुचाकी घेऊन कळंबीच्या दिशेने निघून गेले. सिद्धेवाडी खण येथे बाळासाहेब पाटील (रा. पाटगाव) हे ट्रॅक्टर व्यावसायिक नातेवाइकांच्या प्रतीक्षेत एकटेच थांबले होते. मिरजेकडून आलेल्या चोरट्यांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील ६६०० रुपयांची रोख रक्कम, मोबाईल, एटीएम कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना व दुचाकीची किल्ली हिसकावून घेतली. चोरट्यांनी आणखी पुढे जाऊन खरशिंग फाट्यावर पोलीस असल्याचा बनाव करून पंढरपूरच्या दिशेने जाणारा ट्रक अडविला. ट्रकचालक कैलास बाबूराव शिंदे (४९, रा. जालना) व क्लिनर उमर अब्दुल शेख यांना मारहाण करून ३२ हजारांची रोख रक्कम, दोन मोबाईल असा ऐवज लुटला. एमएच २१ ए ६००९ क्रमांकाच्या ट्रकमधून सोयाबीन भरून ट्रकचालक कैलास शिंदे पंढरपूरला निघाले होते. रात्री सुमारे एकच्या सुमारास ट्रक खरशिंग फाट्यावर आल्यानंतर चोरट्यांनी दुचाकीवरून येऊन पोलीस असल्याचे सांगत ट्रक थांबविण्यास भाग पाडले व लूट केली. लुटमारीच्या घटनेमुळे तेथेच थांबलेले ट्रकचालक कैलास श्ािंदे यांनी रात्रगस्तीला आलेले पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांना माहिती दिल्यानंतर पथकाने मिरजेच्या दिशेने दोन दुचाकीवरून पळून गेलेल्या चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी भास्कर माळी यांची चोरलेली दुचाकी म्हैसाळ हद्दीत टाकून दिल्याचे आढळले. तेथून चोरट्यांनी कर्नाटकात पलायन केल्याचा संशय आहे. याप्रकरणी ट्रकचालक शिंदे व बाळासाहेब पाटील यांनी ग्रामीण पोलिसांत, तर भास्कर माळी यांनी औद्योगिक वसाहत पोलिसांत चौघांविरुद्ध जबरी चोरीची फिर्याद दिली आहे. (वार्ताहर) मध्यरात्री लूटमार टी-शर्ट परिधान केलेले चार चोरटे २५ ते ३० वयोगटातील होते. मराठीत बोलणाऱ्या चोरट्यांनी खरशिंग फाट्यावर ट्रकचालकास पोलीस असल्याचे सांगत ट्रक थांबविण्यास भाग पाडले. सिद्धेवाडी खण येथे बाळासाहेब पाटील यांना मारहाण करून काढून घेतलेले एटीएम कार्ड, दुचाकीची किल्ली, वाहन परवाना दंडोबाच्या पायथ्याशी स्टोनक्रशरजवळ टाकून दिल्याचे आढळले. चोरट्यांनी रात्री बारा ते दोनपर्यंत लूटमार करून दहशत निर्माण केली होती.