शहरं
Join us  
Trending Stories
1
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
4
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
7
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
8
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
9
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
10
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
11
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
12
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
13
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
14
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
15
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
16
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
17
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
20
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उपशिक्षणाधिकारी लोंढे निलंबित

By admin | Updated: May 14, 2015 01:22 IST

नियमबाह्य नियुक्ती : शिक्षकांच्या तक्रारींची दखल

सांगली : शिक्षकांच्या नियमबाह्य नियुक्तीप्रकरणी जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लोंढे यांना शिक्षण आयुक्तांनी बुधवारी निलंबित केले. विशेष म्हणजे लोंढे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असून, निवृत्तीला १८ दिवस राहिले असताना ही कारवाई झाल्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे.लोंढे सध्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे उपशिक्षणाधिकारी असून, त्यांनी १ जून २०१० ते १३ आॅक्टोबर २०१० या कालावधित माध्यमिक शिक्षण विभागाचा कार्यभार असताना शिक्षकांना नियमबाह्य नेमणुका देऊन मागासवर्गीयांच्या जागेवर खुल्या प्रवर्गातील शिक्षकांना मंजुरी दिली होती. तसेच काही शिक्षण संस्थांना शिक्षकांची पदे भरण्यासाठी नियमबाह्य मंजुरी दिली होती. मागासवर्गीयांसाठी आरक्षित पदावर खुल्या प्रवर्गातील शिक्षकांना मंजुरी देणे, अनुकंपा तत्त्वावर नियमबाह्य शिक्षकांच्या नियुक्त्या करणे, राज्याबाहेरील शैक्षणिक पात्रता नसलेल्या शिक्षकांच्या प्रस्तावांना मंजुरी देणे, याबाबत काही शिक्षकांनी शासनाकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. याची गंभीर दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कालावधित त्यांनी जिल्हा परिषदेत रोज हजेरी लावण्याची सूचनाही शासनाने दिली आहे. ते हजर राहिले नाहीत, तर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे. याबद्दल प्राथमिक शिक्षण विभागाकडे विचारणा केली असता, लोंढे गेल्या महिन्याभरापासून कार्यालयात हजर नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, लोंढे दि. ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. (प्रतिनिधी)