शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
4
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
5
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
6
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
7
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
8
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
9
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
10
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
11
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
12
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
13
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
14
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
15
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
16
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
18
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
19
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
20
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

पाणी मागणी अर्जाबाबत शेतकऱ्यांमध्ये उदासीनता

By admin | Updated: April 3, 2015 00:37 IST

म्हैसाळ योजना : पाटबंधारेचे ढिसाळ व्यवस्थापन

नरवाड : पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे म्हैसाळ जलसिंचन योजनेच्या पाणी मागणी अर्जाबाबत शेतकऱ्यांतून उदासीनता दिसून येत आहे. थकित पाणीपट्टीअभावी कृष्णा खोरेच्या म्हैसाळ प्रकल्पाची वीज जोडणी विद्युत वितरण कंपनीने तोडली आहे, असा आरोप पाटबंधारे खाते शेतकऱ्यांवर नेहमीच करीत आहे. मात्र हंगामनिहाय नियमित आवर्तने सुरू ठेवल्यास पाणीपट्टी भरण्यास शेतकरी कचरणार नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत. पाटबंधारे खात्याकडे पाणी सोडण्याची कोणतीही ठोस भूमिका नसल्याने आजवर पिके वाळून गेल्यानंतरच प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आहे. यातही निकृष्ट दर्जाच्या कामाच्या फटक्यामुळे पाणी गळतीचा बोजा शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारला जात आहे. शेतकरी पाणीपट्टी भरण्यास तयार आहेत, मात्र पाटबंधारे खात्याने आकारलेली पाणीपट्टीच शेतकऱ्यांना मान्य नाही. म्हैसाळ प्रकल्पाच्या अपुऱ्या कामाचाही परिणाम पाणीपट्टीच्या दरवाढीवर होत आहे. पाणी पोहोचल्यास पाणीपट्टी भरणे शेतकऱ्यांच्या आवाक्यात येणार आहे. राज्य शासनाच्या टंचाई निधीतून थकित वीज देयके आजवर वेळोवेळी भरली गेल्याने शेतकऱ्यांना शेतीस पाणी सहजगत्या मिळत होते. मात्र चालू शासनाने पाणी सोडण्यास ताठर भूमिका घेतल्याने भविष्यात म्हैसाळ प्रकल्पातून पाणी मिळणे कठीण होणार आहे. म्हैसाळ प्रकल्पाच्या खंडित पाणी पुरवठ्यामुळे कोणतीही खात्रीशीर पिके घेता येत नसल्याने शेतकरी द्विधा मन:स्थितीत अडकला आहे. त्यामुळे पाणी मागणी अर्ज भरून देण्यास टाळाटाळ होत आहे. दरम्यान, एक एप्रिलच्या शासनाच्या अध्यादेशाला शेतकरी कितपत प्रतिसाद देतात, यावर म्हैसाळ प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. (वार्ताहर)

पाटबंधारे खात्याने पाणी सोडण्याचे वेळापत्रक तयार करून पाणी मागणीच्या अर्जाबरोबर शेतकऱ्यांना दिले पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी म्हैसाळ प्रकल्पाचे पाणाी पाजले नाही, पण त्यांच्या विहिरी आणि कूपनलिकेच्या पाण्याच्या पातळ्या वाढल्या आहेत, अशा शेतकऱ्यांना एकरी मायनर पद्धत अवलंबली पाहिजे.
- नेताजीराव निंबाळकर, प्रगतशील शेतकरी, नरवाड (ता. मिरज)



लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी बंद राहिल्यामुळे उन्हाळी पिके वाळू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा त्याचा मोठा फटका बसणार आहे. यामुळे लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे.
अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाणीपट्टी भरण्याबाबत त्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.