शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

डॉल्बी बंदीमुळे पारंपरिक वाद्यांना मागणी

By admin | Updated: September 21, 2015 00:04 IST

बॅन्ड, बँजोचे दर ५० हजारांवर : नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई होणार

सदानंद औंधे - मिरज--डॉल्बीवरील बंदीमुळे गणेशोत्सवात बॅन्ड, बँजो, झांजपथक, नाशिक ढोल, लेझीम, धनगरी ढोल, टाळ-मृदंग व सनई-चौघडा या पारंपरिक वाद्यांना मागणी वाढली आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी बॅन्ड, बँजो व झांजपथकांचे दर ४० ते ५० हजारांपर्यंत पोहोचले आहेत.विसर्जन मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्यांना मोठी मागणी आहे. न्यायालयाने ध्वनी प्रदूषणावर निर्बंध घालण्यापूर्वी गणेशोत्सवात डॉल्बीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने पारंपरिक वाद्यांवर संक्रांत आली होती. मात्र गेल्या पाच वर्षात पोलीस व प्रशासनाकडून डॉल्बी बंदीच्या कठोर अंमलबजावणीमुळे गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. नवव्या व अखेरच्यादिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी बॅन्ड, बँजो, झांजपथक मिळविणे मंडळांना आता अवघड झाले आहे. यावर्षी विसर्जनाच्या अखेरच्यादिवशी मोठ्या मागणीमुळे बॅन्ड, झांजपथकाचे दर ४० ते ५० हजारांपर्यंत पोहोचले आहेत. काही बँजो व झांजपथके ताशी सात ते आठ हजारांची मागणी करीत आहेत. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बँजो व झांजपथके आहेत. मिरजेसह कागवाड, सौंदत्ती, चिकोडी, जमखंडी, अथणी येथील बँड पथकांची ख्याती आहे. याशिवाय नाशिक ढोल हा सनईच्या साथीने ढोलवादनाचा प्रकार, ताशाच्या साथीने तुतारीसारखे वाद्य वाजवित वादकांचे नृत्य, हा नवीन प्रकार मिरवणुकीचे आकर्षण ठरत आहे. नाशिक ढोलसाठी सध्या किमान ३० हजार रुपये दर आहे. लहान मंडळांची धनगरी ढोल, लेझीम, टाळ-मृदंग या स्वस्त वाद्यांना पसंती आहे. मात्र त्यासाठीही दहा ते पंधरा हजार रुपये दर आहे. पारंपरिक वाद्यांना मोठी मागणी असल्याने गणेशोत्सवापूर्वी महिनाभर आधीच वाद्यपथकांचे बुकिंग झाले आहे. शहराऐवजी ग्रामीण भागात वापरमहाराष्ट्रामध्ये डॉल्बीवर बंदी आल्यानंतर कर्नाटकात सीमाभागात डॉल्बीचा वापर सुरू होता. मात्र तेथेही डॉल्बीवर संक्रांत आल्याने डॉल्बीचालक अडचणीत आले आहेत. यामुळे शहराऐवजी ग्रामीण भागात डॉल्बीचा वापर सुरू आहे. विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा वापर रोखण्यासाठी मिरजेत पोलिसांनी ध्वनी मापन करणारी तीन पथके नियुक्त केली आहेत. नियमांचे उल्लंघन करून डॉल्बीचा वापर केल्यास मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची व किमान एक लाखाच्या दंडाची तरतूद आहे. डॉल्बीला बंदी असली तरी, बँजोला डॉल्बीचा बेस बसवून बँजोचा आवाज वाढविण्याचे प्रकारही सुरू आहेत. मात्र पोलिसांनी ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने, पारंपरिक वाद्यांचाच वापर करावा लागणार आहे.