शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर तालुक्यात २८ गावांमध्ये चारा डेपोची मागणी

By admin | Updated: September 8, 2015 22:41 IST

दुष्काळाची दाहकता : चाऱ्याचा प्रश्न गंभीर, टॅँकरने पाणी पुरवठा, तलाव कोरडे

दिलीप मोहिते - विटा  खानापूर तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून, चारा टंचाई निर्माण झाल्याने पशुधन धोक्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर तालुक्यातील २८ गावांनी प्रशासनाकडे चारा छावण्यांऐवजी चारा डेपो सुरू करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्यानंतर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ११ गावांत टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, अजून दोन गावांची टॅँकरची मागणी प्रशासनाने प्रलंबित आहे. खानापूर तालुक्यात जून २०१५ पासून आजअखेर चार महिन्यांत केवळ ८.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अल्प ओलीवर शेतकऱ्यांनी केलेली खरीप पेरणी पूर्णपणे वाया गेली आहे. खानापूर तालुक्यात ८ हजार ५६४ लहान व २७ हजार ६९८ मोठी अशी एकूण ३६ हजार २६२ जनावरांची संख्या आहे. या जनावरांना प्रतिदिन ४६२ टन चाऱ्याची आवश्यकता आहे. परंतु, तालुक्यात सध्या १ हजार १९४ टन चारा उपलब्ध आहे. हा उपलब्ध चारा अवघ्या दोन दिवसांत संपणार आहे. त्यामुळे तालुक्यात चारा छावण्यांऐवजी चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी केली असून, तालुक्यातील २८ गावांनी याबाबतचे प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविले आहेत. खानापूर तालुक्यातील हिवरे, पळशी, बाणूरगड, घाडगेवाडी (कुर्ली), चिंचणी-मंगरूळ, वेजेगाव, घानवड, जोंधळखिंडी, भवरवाडी (भिकवडी बुद्रुक), बामणी व घोटी बुद्रुक या ११ गावातील १८ हजार लोकसंख्येला टॅँकरव्दारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. भिकवडी बुद्रुक व करंजे या गावांची पाणी टॅँकर सुरू करण्याची मागणी आली आहे. तालुक्यातील १४ गावातील कूपनलिका व विहिरी प्रशासनाकडून अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. या गावांनी केली चारा डेपोंची मागणी...खानापूर तालुक्यातील विटा, माहुली, नागेवाडी, पारे, बामणी, कार्वे, गार्डी, खानापूर, पोसेवाडी, ऐनवाडी, घोटी खुर्द, जाधववाडी, रेवणगाव, रेणावी, लेंगरे, वेजेगाव, भिकवडी बुद्रुक, साळशिंगे, मादळमुठी, भेंडवडे, करंजे, देविखिंडी, पळशी, धोंडेवाडी, बलवडी (खा.), बेणापूर, हिवरे व सांगोले या २८ गावांनी पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्यांऐवजी चारा डेपोची मागणी केली असून, त्याबाबतचे प्रस्ताव तहसीलदार अंजली मरोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत.खानापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. ज्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी होईल, त्या गावात तातडीने टॅँकर सुरू करण्यात येतील. - अंजली मरोड,तहसीलदार, विटा.