शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका क्षेत्रात रस्ते अपघातात १,९८४ प्राण्यांचा बळी

By admin | Updated: April 13, 2015 00:08 IST

धक्कादायक वास्तव : बिगरसरकारी संस्थांच्या सर्वेक्षणातील आकडेवारी; सामूहिक खबरदारीतूनच वाचू शकतात मुके जीव

नरेंद्र रानडे - सांगली मागील वर्षी महापालिका क्षेत्रात तब्बल १,९८४ मुक्या प्राण्यांचा रस्ता अपघातात बळी गेला आहे, तर तीनशेहून अधिक प्राणी जखमी झाले आहेत. अर्थात ही आकडेवारी केवळ नोंदविण्यात आलेली आहे. माणसांचे बळी गेल्यावर खडबडून जागी होणारी प्रशासकीय यंत्रणा, निष्पाप प्राण्यांचे एवढे बळी जाऊन मात्र उदासीन आहे.

आधुनिक युगात शहरीकरण अपरिहार्य आहे. परंतु त्याचवेळी त्याच शहरात राहणाऱ्या मुक्या प्राण्यांचा जीव देखील मोलाचा आहे, याचा विसर नागरिकांनी पडू देता कामा नये. हमरस्ता परिसरात उन्हाळ्यात पाण्याच्या शोधार्थ फिरणाऱ्या प्राण्यांचा बळी हा ठरलेला आहे. महापालिका क्षेत्रातील उपनगरांमध्येही वेगाने वाढ होत आहे. तेथे जाण्यासाठी निर्माण होणाऱ्या रस्त्यावर प्रामुख्याने रात्रीच्यावेळी भरधाव वाहनांखाली येऊन मांजर, कुत्री, मुंगूस, बेडूक, इजाट, साप आदी प्राण्यांचा हकनाक बळी जात आहे. शहरातील तीन बिगरसरकारी संस्थांनी महापालिका क्षेत्रात अपघातात प्राणास मुकलेल्या प्राण्यांवर उपचार करण्यात पुढाकार घेतला असून, त्यामधून ही आकडेवारी समोर आली आहे. शहरवासीयांना ती विचार करावयास लावणारी आहे.



रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्राण्यांची विल्हेवाट लावण्याचे कार्य स्वतंत्र यंत्रणेमार्फत आरोग्य विभागाकडून करण्यात येते. अद्यापपर्यंत प्राण्यांचे बळी जाऊ नयेत यासाठी जनजागृतीची कोणतीही मोहीम राबविण्यात आलेली नाही.
- के. जी. गोंधळेकर, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, महापालिका सांगली.



रस्ते अपघातात जखमी झालेल्या प्राण्यांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी ‘अ‍ॅनिमल केअर युनिट’ नावाने रुग्णवाहिका सेवा दोन वर्षांपासून सुरू केली आहे. याच्या माध्यमातून अनेक प्राण्यांचे जीव वाचविण्यात आलेले आहेत.
- मुस्तफा मुजावर, अध्यक्ष, इन्साफ फौंडेशन, सांगली

प्रामुख्याने हमरस्त्यावर वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या प्राण्यांचे बळी मोठ्या प्रमाणात जातात. वन्यप्राण्यांच्या काही जाती सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे वाहनधारकांनी अतिवेगाने वाहने चालवून स्वत:चा व प्राण्यांचाही जीव धोक्यात घालू नये.
- प्रदीप सुतार, वन्यजीवप्रेमी


महापालिकेतर्फे कुत्र्यांची नसबंदी करण्यात येत नसल्याने प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात कुत्र्यांच्या पिलांची संख्या वाढते. दुर्दैवाने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या चाकाखाली येऊन या पिलांचा मृत्यू होतो. त्यामुळे मनपाने तातडीने कुत्र्यांची नसबंदी केली पाहिजे.
- अशोक लकडे, जिल्हाध्यक्ष, पीपल्स फॉर अ‍ॅनिमल.


बळी जाऊ नयेत म्हणून...
महापालिका क्षेत्रात वाहनांचा वेग कमी ठेवावा .
रस्त्यावर ठराविक अंतरावर प्राणीमित्र व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा मोबाईल नंबर फलकावर नमूद असावा.
अपघातात प्राणी जखमी झाल्यास त्याला तातडीने उपचारासाठी वाहनचालकांनी पुढाकार घ्यावा.


प्राण्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट योग्य पध्दतीने लावावी, यासाठी पीपल्स फॉर अ‍ॅनिमल संघटनेचे अशोक लकडे यांनी सांगली-मिरज रस्त्यावर पार्श्वनाथनगरमध्ये दहा गुंठे जागेत स्मशानभूमी उभारली आहे.
महापालिका अ‍ॅक्टनुसार मोकाट प्राण्यांना रस्त्यावर फिरु न देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. परंतु त्याकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येते. परिणामी प्राण्यांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.




प्राणी संख्या
कुत्री४३३
मांजर१५२१
खोकड२
मुंगूस२
इजाट७
पाणकोंबडी ९
भारद्वाज ६
निळी पाणकोंबडी १
गाढव २