शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात विवेकवादाचा आवाज संपविण्याचा धोका

By admin | Updated: May 20, 2015 00:08 IST

मेघा पानसरे : व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रतिसाद

सांगली : भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत केंद्रस्थानी आल्यापासून देशभरातील धर्मांध शक्तींचा उद्रेक वाढत चालला आहे. यामुळे भविष्यात विवेकवादी विचारसरणीचा आवाज संपविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मत डॉ. मेघा पानसरे यांनी सोमवारी व्यक्त केले. बहुजन हिताय शिक्षण व संशोधन संस्थेतर्फे आयोजित केलेल्या व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात ‘पुरोगामी कार्यकर्त्यांपुढील आव्हाने’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. डॉ. पानसरे म्हणाल्या, गोविंदराव पानसरे यांनी आयुष्यभर कार्यकर्त्यांची पुरोगामी बैठक पक्की करण्याचे कार्य केले होते. परंतु त्यांच्यावर भ्याड हल्ला करुन त्यांचा खून करण्यात आला. पुरोगामी नेत्यांचे काहींशी वाद होते. कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या टोल आंदोलनात पानसरे अग्रभागी होते. कोणालाही न घाबरता त्यांनी वाढत्या धर्मांध शक्तींविरोधात उभे राहण्याचे धाडस दाखविले होते. शंकराचार्य यांनी चातुर्वर्णाचा पुरस्कार केला होता. त्यांचा कोल्हापूर येथील कार्यक्रम पानसरे यांच्या प्रखर विरोधामुळे रहित करावा लागला होता. त्यांचा कर्मकांडांना विरोध होता. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पानसरे यांचे हल्लेखोर मोकाट फिरत असतील, तर भविष्यातही पुरोगामी विचारांच्या व्यक्तींच्या हत्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुनर्जन्म, पाप-पुण्य याबाबत भ्रामक प्रचार सुरु असून त्याविरोधात समतेचा विचार समाजमनात रुजविण्याचे आव्हान आपल्यापुढे असल्याचेही डॉ. पानसरे यांनी सांगितले.शिबिराचे उद्घाटन माजी न्यायाधीश सी. एल. थूल यांनी केले. यावेळी त्यांनी बहुजन विद्यार्थ्यांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळविण्याचे आवाहन केले. राजाभाऊ पद्माळकर, अ‍ॅड. के. डी. शिंदे उपस्थित होते. (प्रतिनिधी)