शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

‘डोंगरवाडी’चे पाणी ठरले मृगजळ !

By admin | Updated: August 14, 2015 00:01 IST

शेतकरी संकटात : सोनी परिसरात खरीप पिके वाळली, विहीर व कूपनलिकाही कोरड्या

संजय जाधव - सोनीसह परिसरातील पिके पाण्यावाचून करपली असून, शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. सलग चौथ्यावर्षी खरीप हंगामाने दगा दिल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. म्हैसाळ कालव्याचे पाणी सुरू असते तर, ही परिस्थिती उद्भवली नसती, अशी चर्चा शेतकरी वर्गातून चालू आहे. पाण्याअभावी पिके वाळली असल्याने डोंगरवाडी योजनेचे पाणी हे मृगजळच ठरले आहे.सोनीसह परिसरातील जवळपास २२ गावांना म्हैसाळ कालव्याच्या डोंगरवाडी योजना तयार पूर्ण करावी, यासाठी सतत आंदोलने करण्यात आली. या आंदोलनाला अखेर यशही आले. या योजनेतून पाणीही सोडण्यात आले. त्यामुळे या योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकरीवर्ग आनंदित झाला होता; पण या आनंदावर लगेच विरजण पडले. विजेच्या थकबाकीपोटी म्हैसाळ कालवा बंद पडल्याने डोंगरवाडी योजनेतून पाणी सोडणे कठीण झाले. पाण्याच्या आशेवर मान्सूनचा थोडाफार पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी जवळपास ७० टक्के पूर्ण झाली आहे; पण पावसाने दडी मारल्याने पिकांना पाण्याची गरज आहे; पण पाऊसच नसल्याने विहीर व कूपनलिकांना पाणी नाही. त्यामुळे पाणी नाही. पाण्याअभावी पिके करपली असून, सलग चौथ्यावर्षी खरीप वाया जाण्याची भीती असून, खरिपाचे पीक नसल्याने गरीब शेतकरी हवालदिल झाला आहे. म्हैसाळ कालव्याच्या डोंगरवाडी योजनेतून पाणी सोडले असते, तर अशी परिस्थिती झाली नसती. सोनीसह परिसरात द्राक्षबागेचे क्षेत्र मोठ्याप्रमाणात आहे. पाण्यासाठी शेतकऱ्यांनी खूप लांबून पाईपलाईन करून स्वखर्चाने पाणी आणले आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची गरज येथील शेतकरी चांगला जाणतो आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका या शेतकऱ्यालाही बसला आहे. त्यातच या पावसाने दडी मारल्याने पाणी संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पाणी मागणी अर्ज भरण्यास शेतकऱ्यांनी दाखवलेली निराशा व पाटबंधारे खात्याच्या भोंगळ कारभारामुळे पाणी बंदच असून, पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी खात्याकडून कठोर निर्णयाची गरज आहे. पाटबंधारे खात्याचा भोंगळ कारभारसोनी येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार सतीश जाधव यांनी सांगितले की, पाणी मागणी अर्ज भरण्यास शेतकऱ्यांनी केलेली टाळाटाळ व पाटबंधारे खात्याच्या भोंगळ कारभारामुळे पाणी बंदच आहे. सोनी परिसरातील पिके पाण्याअभावी करपली असून, डोंगरवाडी योजनेचे पाणी मिळाले असते तरी, शेतकऱ्यांना नक्कीच फायदा झाला असता. पावसाने अशीच दडी मारली तर, द्राक्षबागेच्या छाटणीसाठीही पाण्याची टंचाई होण्याची शक्यता आहे.