सांगली : जुना कुपवाड रस्त्यावरील दुधाळ कॉर्नरजवळ महापालिकेच्या मूव्हेबल दुकान गाळ्याजवळील नशेखोरांच्या अड्ड्यावर पूर्ववैमनस्यातून सौरभ महादेव पवार (वय २२, रा. राजीवनगर, कुपवाड रस्ता, सांगली) या तरुणाचा दोघांनी निर्घृण खून केला. शाहीद समीर मुल्ला व आयान समीर भिस्ती (दोघे, रा. राजीवनगर) या दोघांनी खून केल्याचे पोलिस तपासांत स्पष्ट झाले. खुनानंतर हत्यार घेऊन पळणाऱ्या शाहीद मुल्ला यास पोलिसांनी ताब्यात घेतले, तर आयान पसार झाला आहे. मृत सौरभ घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित असून, हल्लेखोर दोघे दुचाकी चोरीतील संशयित आहेत.पोलिसांनी सांगितले की, सौरभ हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आरवाडे पार्कमधील घरफोडीप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. राजीवनगर येथे तो आई-वडिलांसह राहत होता. सध्या तो फरशी फिटिंगचे काम करीत होता. शाहीद मुल्ला व आयान भिस्ती हेदेखील यांच्यावर दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तिघेही नशा करत होते. कुपवाड रस्त्यावरील दुधाळ कॉर्नरवरील महापालिकेच्या गाळ्यामागे नशेखोरांच्या अड्ड्यांवर ते भेटत असत. काही दिवसांपूर्वी सौरभ आणि संशयित यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली होती.सोमवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास सौरभ आणि त्याचा मित्र ओंकार पाथरवट हे दोघेजण दुचाकीवरून महापालिकेच्या गाळ्याजवळ आले. तेव्हा संशयित दोघेजण दुचाकीजवळ आले. सौरभला दुचाकी नवीन घेतलास काय ? असे म्हणत त्याच्या गळ्यावरच धारदार शस्त्राने थेट वार केला. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर सौरभ सावध होऊन दुचाकी टाकून पळाला. तेव्हा दोघांनी त्याचा पाठलाग केला.एका गाळ्यासमोर त्याला गाठून एडका व चाकूसारख्या धारदार शस्त्राने सौरभच्या पाठीवर, पोटावर, मानेवर वार केले. जखमी अवस्थेतही सौरभ हल्ल्याच्या ठिकाणापासून मागील बाजूस असलेल्या राजीवनगर येथील घराकडे पळाला. घराजवळ गेल्यानंतर त्याला जखमी अवस्थेत पाहून शेजारील लोकांनी रुग्णवाहिकेतून तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले; परंतु तो वाटेतच मृत झाला होता.
दरम्यान, हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. गाळेधारकांनी पटापट दुकाने बंद केली. हल्ल्यानंतर शस्त्र घेऊन पळणाऱ्या दोघांपैकी शाहिदला एका पोलिस कर्मचाऱ्याने पकडले, तर आयान भिस्ती पळाला. संजयनगर पोलिसांना कळवून शाहिदला त्यांच्या ताब्यात दिले. खुनाची माहिती मिळताच संजयनगरचे पोलिस निरीक्षक सतीश कदम यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आयानला पकडण्यासाठी पथक रवाना केले. पोलिस उपअधीक्षक संदीप भागवत यांनी घटनास्थळी भेट देऊन संजयनगर पोलिसांना सूचना केल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकदेखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पसार संशयित आयानचा शोध सुरू केला.
अड्ड्यावर खुनी हल्ल्यानंतर खूनकाही दिवसांपूर्वी महापालिकेच्या गाळ्यामागील नशेखोरांच्या अड्ड्यावर एका तरुणावर खुनी हल्ला झाला होता. त्यानंतर त्याच ‘स्पाॅट’वर सोमवारी एका गुन्हेगाराचा खून झाला. त्यामुळे हा ‘डार्क स्पॉट’ पुन्हा प्रकाशझोतात आला आहे.
Web Summary : In Sangli, a criminal, Saurabh Pawar, was murdered at a drug den due to prior animosity. One attacker, Shahid Mulla, is arrested; another, Ayan Bhisti, is absconding. Both attackers have prior records of bike theft and the victim has a record of burglary.
Web Summary : सांगली में, सौरभ पवार नामक एक अपराधी की नशे के अड्डे पर पुरानी दुश्मनी के कारण हत्या कर दी गई। एक हमलावर, शाहिद मुल्ला, गिरफ्तार; दूसरा, अयान भिस्ती, फरार है। दोनों हमलावरों पर बाइक चोरी के मामले दर्ज हैं और पीड़ित पर चोरी का मामला दर्ज है।