शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

रिळेच्या उपसरपंचाविराेधात जातिवाचक शिवीगाळीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:28 IST

शिराळा : रिळे (ता. शिराळा) येथील उपसरपंच बाजीराव पांडुरंग सकपाळ यांच्याविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ केल्याबद्दल तसेच संजय ज्ञानदेव आढाव, योगेश ...

शिराळा : रिळे (ता. शिराळा) येथील उपसरपंच बाजीराव पांडुरंग सकपाळ यांच्याविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ केल्याबद्दल तसेच संजय ज्ञानदेव आढाव, योगेश संजय आढाव, दीपाली संजय आढाव या तिघांविरुद्ध मारहाण करून सोन्याची चेन, मोबाईल व रोख रक्कम असा ४७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरल्याचा गुन्हा शिराळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १६ सप्टेंबरला दुपारी १ वाजता घडली. मात्र, फिर्यादी उपचारासाठी दाखल असल्याने शुक्रवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी प्रताप राजाराम काळे यांनी घरकुल योजनेच्या गैरव्यवहारबाबत लेखी तक्रार दिली होती. या चौकशीसाठी त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलाविले होते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर संजय आढाव, योगेश आढाव, दीपाली आढाव यांनी लाथा-बुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले, तसेच गळ्यातील एक तोळ्याची चेन, रोख ५ हजार ५०० रुपये, मोबाईल असा ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरला. यादरम्यान उपसरपंच बाजीराव सपकाळ यांनी जातिवाचक शिवीगाळ केली.

याप्रकरणी उपसरपंच बाजीराव सपकाळ यांच्याविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ केल्याबद्दल तर इतर तिघांविरुद्ध मारहाण करून ऐवज चोरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे करत आहेत.