शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
3
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
4
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
5
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
6
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
7
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
8
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
9
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
10
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
11
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
12
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
13
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
14
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
15
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
16
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
17
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
18
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
19
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
20
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
Daily Top 2Weekly Top 5

गाईचे कातडेप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा

By admin | Updated: December 25, 2014 00:09 IST

मिरजेत कारवाई : ३४ लाखांचा माल जप्त

मिरज : मिरजेत गाईचे कातडे असल्याच्या संशयावरून सुमारे १५ टन कातडे व ट्रक असा ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन परप्रांतीयांसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. मिरजेतील उदगाव वेस येथे के. ए. ०१ एबी ३८६८ या क्रमांकाच्या ट्रकमध्ये चेन्नईला पाठविण्यासाठी कातडे भरले होते. पीपल्स फॉर अ‍ॅनिमलचे अशोक लकडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ट्रकमध्ये गाईचे व बैलाचे कातडे असल्याची पोलिसांकडे तक्रार केली. मिरजेतून चेन्नईतील एम. ईब्राहीम या व्यापाऱ्याकडे हे कातडे पाठविण्यात येत होते. पोलिसांनी २३ लाख ७५ हजार रूपयांचे कातडे व दहा लाखांचा ट्रक जप्त केला आहे. ट्रकमधील कातडे कोणत्या प्राण्यांचे, याचा अहवाल अद्याप पशुवैद्यक तज्ज्ञांकडून पोलिसांना मिळालेला नाही. मात्र लकडे यांनी पोलिसांत फिर्याद दिल्याने ट्रकचालक राजेंद्रन जी गोविंदन (वय ४५), शिवकुमार गोविंद स्वामी (४०, रा. मिन्नुर, जि. वेल्लोर, तामिळनाडू), ट्रकमध्ये कातडे भरणारा संजय रघुनाथ सोनवणे (४२, रा. उदगाव वेस) या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या कातड्याची व ट्रकची किंमत सुमारे ३४ लाख रूपये आहे. कातडे दोन दिवसात सडण्याची शक्यता असल्याने त्याच्या विल्हेवाटीबाबत पोलिसांनी न्यायालयाकडे परवानगी मागितली. कातड्याच्या विल्हेवाटीसाठी उद्या न्यायालयाकडे पुन्हा परवानगी मागण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)