मल्लिकार्जुन डोंगरावर जाळ पट्टा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST2021-02-05T07:28:55+5:302021-02-05T07:28:55+5:30

कामेरी : मल्लिकार्जुन डोंगरावर आग किंवा वणव्याने पेटून झाडांचे व वन्यजीवांचे नुकसान होऊ नये म्हणून मल्लिकार्जुन डोंगरावर वन विभागाने ...

Create a mesh belt on Mallikarjun hill | मल्लिकार्जुन डोंगरावर जाळ पट्टा तयार

मल्लिकार्जुन डोंगरावर जाळ पट्टा तयार

कामेरी : मल्लिकार्जुन डोंगरावर आग किंवा वणव्याने पेटून झाडांचे व वन्यजीवांचे नुकसान होऊ नये म्हणून मल्लिकार्जुन डोंगरावर वन विभागाने स्थनिक ग्रामस्थांच्या मदतीने जाळ पट्टा तयार केला आहे. यामुळे वन विभाग, मल्लिकार्जुन सेवाभावी मंडळ, ज्ञानार्पण युथ फौंडेशन यांनी गेल्या चार वर्षांपासून लावलेल्या झाडांचे रक्षण होण्यास मदत झाली आहे.

गेली दोन, तीन वर्षे दरवर्षी डोंगरास आग लागत होती. यात परिसरातील झाडांचे मोठे नुकसान होत होते. यामुळे आग लागल्यावर ती सर्वत्र पसरू नये म्हणून जाळ पट्टा तयार करण्यात आला आहे. डोंगराच्या कडेकडेने थोड्या-थोड्या अंतराचा छोटासा जाळ पट्टा काढण्यात आला आहे. यामुळे आग लागली तर ती मर्यादित भागातच राहते व वृक्षांचे संरक्षण होते.

यासाठी वन विभागाचे अमोल साठे, क्षेत्रीय सहायक भगवान गायकवाड, निवास उगळे, विजय मदने, शंकर पाटील, बंडा, विशाल व इतर सहकाऱ्यांनी नियोजन केले. या जाळ पट्ट्यामुळे मल्लिकार्जुन डोंगर परिसराचे उन्हाळ्यात आग व वणव्यापासून संरक्षण होणार आहे, अशी माहिती मल्लिकार्जुन सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ गुरव यांनी दिली.

फोटो - २९०१२०२१-आयएसएलएम- कामेरी न्यूज

मल्लिकार्जुन डोंगर आग किंवा वणव्याने पेटून झाडांचे व वन्यजीवांचे नुकसान होऊ नये यासाठी जाळ पट्टा तयार करताना वन विभागाचे कर्मचारी.

Web Title: Create a mesh belt on Mallikarjun hill