आष्टा ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST2021-02-05T07:27:46+5:302021-02-05T07:27:46+5:30

आष्टा : आष्टा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स व परिचारिकांना सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस देण्यात आली. आष्टा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ...

Covid vaccination started at Ashta Rural Hospital | आष्टा ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरणास सुरुवात

आष्टा ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरणास सुरुवात

आष्टा : आष्टा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स व परिचारिकांना सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस देण्यात आली.

आष्टा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष निगडी म्हणाले, आष्टा, बागणी, बावची येथील सर्व डॉक्टर्स, आरोग्य सेविका, अंगणवाडी मदतनीस व इतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस देण्यात येणार आहे. सुमारे ७०० लाभधारकांना ही लस देण्यात येणार आहे. या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. इस्लामपूरचे प्रांताधिकारी नागेश पाटील, अतिरिक्त तहसीलदार श्रीकांत सबनीस, राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे, नगराध्यक्ष स्नेहा माळी, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, नगरसेवक अर्जुन माने, जायंट‌्सचे अध्यक्ष समीर गायकवाड, डॉ. सतीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आष्टा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष निगडी, डॉ. राहुल मेटकर, शिराळा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, डॉ. अविनाश पाटील, डॉ. सतीश पाटील यांना परिचारिका अस्मिता कोळी व आरती कोळी यांनी सर्वप्रथम लस दिली.

बागणी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. एन. आय. शिकलगार, व्यवस्थापक डी. बी. कांबळे, तहसील कार्यालयातील लेखापाल महेश वाहवळ, सूर्यकांत जुगदर, सुहास पाटील यांच्यासह डॉक्टर, परिचारिका उपस्थित होत्या.

फोटो : २५ आष्टा १

ओळ : आष्टा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष निगडी यांना अस्मिता कोळी यांनी काेराेना प्रतिबंधक लस दिली. यावेळी प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार श्रीकांत सबनीस, वैभव शिंदे, झुंजारराव पाटील, स्नेहा माळी, समीर गायकवाड, डी. बी. कांबळे, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. राहुल मेटकर आदी उपस्थित हाेते.

Web Title: Covid vaccination started at Ashta Rural Hospital