सांगलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विवेकानंद फोरममार्फत शंभर बेडचे कोविड सेंटर सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 02:56 PM2021-05-05T14:56:42+5:302021-05-05T14:58:23+5:30

corona virus Rss Sangli : कोरोनाकाळात रुग्णांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती, विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान आणि सांगली कोविड केअर रिसोर्सेस फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीत १०० बेडच्या स्वामी विवेकानंद कोविड केअर सेंटर उभारण्यात आले.

Covid center of 100 beds started in Sangli | सांगलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विवेकानंद फोरममार्फत शंभर बेडचे कोविड सेंटर सुरु

सांगलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विवेकानंद फोरममार्फत शंभर बेडचे कोविड सेंटर सुरु

Next
ठळक मुद्देसांगलीत शंभर बेडचे कोविड सेंटर सुरुराष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विवेकानंद फोरममार्फत पुढाकार

सांगली : कोरोनाकाळात रुग्णांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती, विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान आणि सांगली कोविड केअर रिसोर्सेस फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीत १०० बेडच्या स्वामी विवेकानंद कोविड केअर सेंटर उभारण्यात आले.

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी करण्यात आले. सांगली-मिरज रोडवरील श्री राधास्वामी सत्संग व्यासच्या जागेत सेंटर सुरु झाले आहे. येथे शंभर बेडची सोय करण्यात आली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशावेळी सामाजिक भान म्हणून संघाने हे कोविड सेंटर सुरु केले आहे.

ज्यांची अँटीजन टेस्ट, आरटीपीसीर टेस्ट पॉझीटीव्ह आली आहे व कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत, अशा रुग्णांसाठी हे कोविड सेंटर आहे. या रुगणांना दाखल करुन घेताना दोन किट देण्यात येणार आहेत. एक औषधाचे किट आणि दुसरे चादर, टूथपेस्ट, ब्रश,पाण्याची बॉटल यासह आवश्यक साहित्याचे किट देण्यात येणार आहे.

या ठिकाणी सात डॉक्टरांची एक स्वतंत्र टीम काम करीत आहे. दोनवेळा रुग्णांना आयुर्वेदीक काढा देण्यात येणार आहे. दोनवेळचे चहा, नाष्टा, जेवण आणि रहाण्याची मोफत सोय आहे. दररोज प्राणायम, समूपदेशन करण्यात येणार आहे. १५ स्वयंसेवक या सेंटरवर काम करणार आहेत.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक विलास चौथाई, जनकल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष संजय कुलकर्णी, महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती पांडूरंग कोरे, विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानचे डॉ. राम लाडे, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ आदी उपस्थित होते. आभार जिल्हा कार्यवाह नारायण जोशी यांनी मानले.
 

Web Title: Covid center of 100 beds started in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.