शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

डॉल्बीवाल्यांना न्यायालयाचा दणका

By admin | Updated: September 11, 2015 00:53 IST

शिराळ््यातील नाग मंडळे अडचणीत : जप्त केलेले डॉल्बीचे साहित्य परत न करण्याचे न्यायालयाचे आदेश

सांगली : शिराळा येथे नागपंचमीवेळी काढलेल्या मिरवणुकीत ‘डॉल्बी’चा दणदणाट करून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणाऱ्या नाग मंडळे व डॉल्बी मालकांना जिल्हा न्यायालयाने गुरुवारी जबर चपराक दिली. त्यावेळी जप्त केलेले डॉल्बी परत देऊ नयेत, असा आदेश न्यायालयाने दिला. शिराळा न्यायालयाने डॉल्बी परत करण्याचे आदेश दिले होते. या निकालाला पोलिसांनी आव्हान दिले होते. त्यावर जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिला. गेल्या महिन्यात नागपंचमी झाली. शिराळ्यातील नागपंचमी जगप्रसिद्ध आहे. यावेळी डॉल्बीचा दणदणाट करून ध्वनी प्रदूषण करू नका, उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी नाग मंडळांना केले होते, पण तरीही शिराळ्यातील १४ नाग मंडळांनी मिरवणुकीत डॉल्बीचा वापर केला होता. डॉल्बीचा आवाजही मर्यादेपेक्षा जादा होता. पोलिसांनी त्यांना आवाज कमी करण्याविषयी सांगितले होते. पण त्यांनी ऐकले नव्हते. डॉल्बीचा दणदणाट सुरुच ठेवला होता. डॉल्बीचा आवाज व ध्वनी प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा त्यांनी भंग केला होता. त्यामुळे जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंडळांचे कार्यकर्ते, डॉल्बी मालक व चालक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. १४ डॉल्बी जप्त करण्यात आले होते. जप्त केलेले डॉल्बी परत करावेत, अशी मागणी डॉल्बी मालक व नाग मंडळांच्या कार्यकर्त्यांनी शिराळा न्यायालयात केली होती. त्यानुसार न्यायालयाने हे डॉल्बी परत द्यावेत, असा आदेश दिला होता. या आदेशाला पोलिसांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर गेल्या आठवड्यापासून सुनावणी सुरु होती. सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, नाग मंडळांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केलेले नाहीत. त्यांनी आवाजाची मर्यादा ओलांडली असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. आता जर त्यांना डॉल्बी परत केले, तर ते पुन्हा गणेशोत्सवात डॉल्बीचा दणदणाट सुरुच ठेवतील. यातून ध्वनी प्रदूषण होऊ शकते. त्यामुळे डॉल्बी परत देऊ नयेत. बचाव पक्षाच्या वकिलांचाही युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन, जप्त केलेले डॉल्बी परत देऊ नयेत, असा निकाल न्यायालयाने दिला. या निकालामुळे नाग मंडळे व डॉल्बी मालकांना चपराक बसली आहे. (प्रतिनिधी)