शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

CoronaVirus News: कोरोना रुग्णांसाठी शासनाकडून निधी मिळत असल्याची निव्वळ अफवाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 12:56 AM

कोरोना रूग्णामागे प्रत्येकी दीड लाख, तर कंटेनमेंट झोनसाठी पाच लाख रूपये मिळत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे.

सांगली : शासनाकडून कोरोना रूग्णांसाठी ठराविक निधी मिळत आहे, अशा चर्चेने सोशल मीडियावर जोर धरला आहे. मात्र, असे काहीही नसून शासनाकडून एकूण कोरोना नियंत्रण व त्यावरील उपाययोजनांसाठी निधी मिळत आहे. ठराविक रूग्णसंख्येला रक्कम मिळत असल्याची निव्वळ अफवा आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.  कोरोना रूग्णामागे प्रत्येकी दीड लाख, तर कंटेनमेंट झोनसाठी पाच लाख रूपये मिळत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना जिल्हाधिकाऱ्यांनी, ही चर्चा केवळ अफवा असल्याचे सांगितले.

डॉ. चौधरी म्हणाले, महसूल, आरोग्य, महानगरपालिका, नगरपालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून कोरोना नियंत्रणासाठी नियोजन करण्यात येत आहे. यासाठी आतापर्यंत १० कोटी २० लाखांचा निधी मिळाला आहे, तर आणखी ४ कोटींची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात होणाºया विकास कामांवरील काही निधीही कोरोनासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानुसार डीपीडीसीतून साडेसात कोटींचा निधी मिळाला आहे.

अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई

सोशल मीडियावर कोरोना रूग्णामागे दीड लाख रूपये मिळतात, अशा आशयाची पोस्ट व्हायरल होत आहे. हा पूर्णपणे खोडसाळपणा असून या आशयाची पोस्ट टाकणारे व अफवा पसरविणाºयांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSangliसांगली