जिल्ह्यात ४११ जणांना कोरोना; चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST2021-04-11T04:26:54+5:302021-04-11T04:26:54+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ कायम असून शनिवारी पुन्हा एकदा सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. ४११ जणांना कोरोनाचे निदान ...

Corona to 411 people in the district; Death of four | जिल्ह्यात ४११ जणांना कोरोना; चौघांचा मृत्यू

जिल्ह्यात ४११ जणांना कोरोना; चौघांचा मृत्यू

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ कायम असून शनिवारी पुन्हा एकदा सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. ४११ जणांना कोरोनाचे निदान होतानाच चारजणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात तब्बल १५८ नवे रुग्ण आढळले आहेत.

पाच महिन्यातील सर्वाधिक बाधितांची संख्या शनिवारी नोंदली गेली असल्याने कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. कडेगाव, मिरज, वाळवा आणि तासगाव तालुक्यातील चारजणांचा मृत्यू झाला आहे. २२७ जण कोरोनामुक्त झाले असलेतरी रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढविणारी ठरत आहे.

आरोग्य विभागाच्यावतीने आरटीपीसीआर अंतर्गत १९९० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात १५९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर रॅपिड ॲन्टिजेनच्या १५६८ जणांच्या तपासणीतून २७९ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. प्रशासनाने चाचण्यांचे प्रमाण वाढवले असतानाच पॉझिटिव्हचेही प्रमाण वाढत आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ५१७ जण अत्यवस्थ असून त्यातील ४७२ जण ऑक्सिजनवर तर ४५ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. सोलापूर ५, कोल्हापूर १०, सातारा ७, कर्नाटक ३ आणि पुणे, रत्नागिरी येथील प्रत्येकी एकास कोरोनाचे निदान झाले आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ५५०६७

उपचार घेत असलेले ३५६५

कोरोनामुक्त झालेले ४९६६१

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १८४१

शनिवारी दिवसभरात

सांगली १११

मिरज ४७

वाळवा ६१

खानापूर ३४

मिरज तालुका २८

जत २७

पलूस २५

तासगाव २०

कडेगाव १८

आटपाडी १६

कवठेमहांकाळ, शिराळा प्रत्येकी १२

Web Title: Corona to 411 people in the district; Death of four