शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात रस्ते निधी वर्ग करण्यावरून वादंग

By admin | Updated: August 14, 2015 00:04 IST

बी. ए. पाटील यांची हरकत : बहुमताने विषयाला मंजुरी--नगरपालिका सभा

इस्लामपूर : इस्लामपूर शहराची भुयारी गटर योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत राबवण्याच्या विषयावर गुरुवारी सभागृहातील सत्तारूढ गटामधील अंतर्गत संघर्ष पुन्हा उफाळून आला. भुयारी गटर योजना झालीच पाहिजे; मात्र रस्ते विकास प्रकल्पाचा २३ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी व त्यावरील व्याज वर्ग करण्याला विरोध करणारी ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील यांची हकरत बाजूला ठेवत बहुमताने हा विषय मंजूर करण्यात आला, तर अन्य एक विषय उपनगराध्यक्ष संजय कोरे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे तहकूब ठेवण्यात आला.पालिका सभागृहात नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी दीपक झिंझाड यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सभा झाली. भुयारी गटर योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून राबवण्याचा विषय चर्चेला आल्यावर पाणी पुरवठा विभागाचे अभियंता आर. आर. खांबे यांनी त्यासंबंधीच्या ठरावाचे वाचन केले.बी. ए. पाटील म्हणाले की, २०१३ मध्ये रस्ते विकास प्रकल्पासाठी २३ कोटी ५८ लाखांचे अनुदान प्राप्त झाले. ते खर्च करण्याच्या दृष्टीने टप्पा क्रमांक १ मधील सहा उपघटक धरून रस्ते प्रस्तावित केले. त्यासाठी आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही झाली. रस्ते विकास प्रकल्पात आमची जी कामे अंतर्भूत होती, ती गेल्या साडेतीन वर्षांत झाली नाहीत. पुण्याच्या आॅस्टिट्यूट कंपनीने अंदाजपत्रे तयार करून त्याला प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीही मिळवली होती. त्यावेळी निविदा काढणे गरजेचे होते. अ‍ॅस्टिट्यूटने गाशा गुंडाळल्यानंतर पुन्हा पुण्याच्याच मोनार्च कंपनीला अंदाजपत्रक करण्यासाठी किती निधी दिला, असे विचारल्यावर लेखापाल टिबे यांनी ४० लाख रुपये दिल्याची माहिती दिली.पाटील म्हणाले की, साडेतीन वर्षात रस्त्यावर नखभर खडी किंवा किलोभर डांबर टाकू शकलो नाही. टप्पा क्रमांक एकमधील रस्ते करायला हवे होते. दलितेत्तर प्रभागातही अडचणी आहेत. त्यामुळे हा रस्ते विकास प्रकल्प प्रलंबित ठेवण्याचे कारण काय? दोन वर्षातील अखर्चीत शासकीय निधीची माहिती शासनाने मागवली आहे. भुयारी गटर योजना झालीच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. रस्ते विकास प्रकल्पाचे पैसे वर्ग करण्याला विरोध दर्शवून पाटील यांनी हरकतीचा मुद्दा दाखल केला. यावर नगरसेवक खंडेराव जाधव म्हणाले की, २४ बाय ७ पाणी योजना, भुयारी गटर आणि रस्ते विकासाची कामे पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी एकाचवेळी राबवण्याचे धोरण गट बैठकीत ठरले होते. २४ बाय ७ व भुयारी गट योजनेचे विषय अंतिम मंजुरीच्या टप्प्यावर असताना सत्ताबदल झाला. त्यामुळे धोरणात बदल करावा लागतो. भुयारी गटर योजनाही करावी. उपनगराध्यक्ष संजय कोरे यांनीही भुयारी गटर योजनेत शहरातील कोणते भाग येत नाहीत, भुयारी गटर प्रस्तावित असणाऱ्या भागातील किती रस्ते झाले, असा प्रश्न उपस्थित केला. काही रस्ते झालेत, असे उत्तर अभियंता खांबे यांनी दिल्यावर किती आणि कुठल्या भागातील रस्ते झाले, याचा अहवाल द्या, अशी सूचना कोरे यांनी केली. पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनी दीड वर्षात कामे पूर्ण होतील याची खात्री देतो, असे स्पष्ट केल्यावर पाटील यांची हरकत बाजूला ठेवत बहुमताने हा विषय मंजूर केला. (वार्ताहर)उपनगराध्यक्षांचा सभात्यागाचा इशारारमाई आवास योजनेच्या रेखांकनातील खुली जागा, रस्ते, पाण्याची टाकी, दुकान गाळे, ट्रान्सफॉर्मरसाठी दलित वस्ती योजनेतून जादा निधी मागण्याच्या प्रस्तावावर उपनगराध्यक्ष कोरे यांनी तीव्र विरोध दर्शवत सभात्याग करण्याचा इशारा दिला. शेवटी या विषयावर गटबैठकीत चर्चा न झाल्याने तो तहकूब ठेवण्यात आला