शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

यल्लम्मा देवीच्या यात्रेवरून जत नगरपालिकेत वादंग

By admin | Updated: November 24, 2015 00:21 IST

सत्ताधारी-विरोधी गटात राजकीय संघर्ष : सुविधा नगरपालिकेच्या, उत्पन्न प्रतिष्ठानला; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

जयवंत आदाटे -- जत---येथील यल्लम्मा देवीची यात्रा भरविण्यावरून जत नगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधी गटात राजकीय सत्ता संघर्ष सुरू झाला आहे. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून ठोस भूमिका घेतली नाही तर ऐनवेळी यात्रा कालावधित किंवा यात्रेच्या पूर्वसंध्येला अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे.यल्लम्मादेवी मंदिर व मंदिर परिसरात असलेली सुमारे सत्तर एकर जमीन संस्थानिक डफळे यांची खासगी मालमत्ता आहे. जत ग्रामपंचायत अस्तित्वात असताना ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी म्हणून तत्कालीन संस्थानिकांनी ग्रामपंचायतीला यात्रा भरविण्याचे सर्वाधिकार दिले होते. त्यातून ग्रामपंचायतीला काही प्रमाणात उत्पन्न मिळत होते व भाविकांना सोयी-सुविधा पुरविण्यात येत होत्या.२०१२ मध्ये जत ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर झाल्यापासून यल्लम्मादेवी प्रतिष्ठानच्यावतीने यात्रा भरविण्यात येत आहे. मागील तीन वर्षात यात्रेत येणारे पाळणे व इतर व्यावसायिकांना जागा देण्यावरून प्रतिष्ठान आणि गावातील काही सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवकांमध्ये हमरी-तुमरी होऊ लागली आहे. भाविकांसाठी सर्व सुविधा नगरपालिका पुरवत आहे, परंतु प्रतिष्ठान सर्व उत्पन्न घेत आहे. यातून पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे, असा आरोप सत्ताधारी नगरसेवक करत आहेत, तर यात्रेची जागा प्रतिष्ठानची असून, मंदिरही त्यांच्या खासगी मालकीचे आहे. त्यामुळे यात्रा भरविण्याचा सर्वाधिकार प्रतिष्ठानला आहे, असा दावा नगरसेवक परशुराम मोरे यांनी केला आहे.ही यात्रा दोन ते दहा जानेवारी २०१६ दरम्यान भरविण्यात येणार आहे. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अशी जत शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे. यात्रेतील पाळणा, तमाशा व इतर ठिकाणी असलेल्या महत्त्वाच्या जागा कोणाला मिळणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या जागेवर कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. जत ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी म्हणून तत्कालीन संस्थानिकांनी यात्रा भरविण्यासाठी त्यांना परवानगी दिली होती. राजकीय द्वेषातून सूडबुद्धीने भाविकांमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी यात्रा भरविण्यात येईल, असा फार्स केला आहे. त्यांना कोणताही कायदेशीर अधिकार नाही. यात्रेची पूर्वतयारी केली असून, यासंदर्भात प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी दिली आहे. यात्रेसाठी : पालिकेची विशेष सभायात्रा भरविण्यासंदर्भात जत नगरपालिकेने विशेष सभा बोलाविली आहे. या सभेत ठराव संमत करून जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष इकबाल गवंडी यांनी दिली.