कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे तण उपटून टाकावे : देवेंद्र फडणवीस

By Admin | Updated: October 8, 2014 23:00 IST2014-10-08T22:38:55+5:302014-10-08T23:00:26+5:30

भिलवडी : पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रचारसभेत आवाहन

Congress-NCP should weed out: Devendra Fadnavis | कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे तण उपटून टाकावे : देवेंद्र फडणवीस

कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे तण उपटून टाकावे : देवेंद्र फडणवीस

भिलवडी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत स्वच्छता अभियान सुरू केले, पण महाराष्ट्र खऱ्याअर्थाने स्वच्छ करावयाचा झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचे तणकट उपटून टाकल्याशिवाय महाराष्ट्र प्रगतीपथावर जाणार नसल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रचारार्थ भिलवडी (ता. पलूस) येथे आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादीने भ्रष्टाचार, गुन्हेगारी, बलात्कार, अत्याचारामध्ये महाराष्ट्र पुढे नेला आहे. केंद्रात आणि राज्यामध्ये एकच सरकार असेल, तर महाराष्ट्र प्रगतीपथावर जाईल.
यावेळी खा. राजू शेट्टी, पृथ्वीराज देशमुख यांचे भाषण झाले. रासपचे महादेव जानकर, राजाराम गरुड, लालासाहेब यादव, अमर इनामदार, किरण लाड, महावीर चौगुले, आर. एम. पाटील, गजानन मोहिते, आप्पासाहेब वावरे, सुरेंद्र चौगुले, राजेंद्र पाटील, तानाजी भोई, अजित जाधव, उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Congress-NCP should weed out: Devendra Fadnavis