शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्ट राष्ट्रवादीमुळे काँग्रेसला फटका : विश्वजित कदम

By admin | Updated: November 21, 2014 00:30 IST

राष्ट्रवादी सत्तेत नको, म्हणून काँग्रेसला अनेक ठिकाणी जनतेने नाकारले.

कडेगाव : काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढली तरीही आघाडी होणारच, या भावनेतून लोकांनी काँग्रेसलाही फटका दिला. राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर सर्वत्र नाराजी होती. राष्ट्रवादी सत्तेत नको, म्हणून काँग्रेसला अनेक ठिकाणी जनतेने नाकारले. भ्रष्ट राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेल्या मैत्रीची किंमत काँग्रेसला मोजावी लागली, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले.अंबक (ता. कडेगाव) येथील अंबक सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या लाभांश वाटप समारंभात ते बोलत होते. कदम म्हणाले की, राज्यात ७८ ठिकाणी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. ३७ ठिकाणी १ ते १५ हजारांच्या फरकाने काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला आहे. राज्यातील २५ जागा वरिष्ठ स्तरावरील कारभारामुळे गेल्या आहेत. संस्थांमध्ये भ्रष्टाचारामुळे सहकार चळवळीला गालबोट लागले आहे. परंतु डॉ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखालील सर्व संस्थांची आदर्शवत वाटचाल सुरू आहे. जसा नेता तसे कार्यकर्ते, याप्रमाणे कार्यकर्त्यांनीही त्यांच्या ताब्यातील गावोगावच्या सहकारी सोसायट्यांचा कारभार आदर्शवत केला आहे, असे कदम यांनी सांगितले.प्रारंभी अंबक सोसायटीच्या सभासदांना ७ टक्के लाभांश वाटप करण्यात आले. यावेळी सहायक निबंधक अमोलसिंह डफळे, सुनील जगदाळे, विलास शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. जि. प. सदस्य शांताराम कदम, युवा नेते डॉ. जितेश कदम, ‘सोनहिरा’चे उपाध्यक्ष निवृत्ती जगदाळे, संचालक आकाराम मेखे, बाळकृष्ण पाटील, वैभव गायकवाड, आकांक्षा तांबेवाघ, एन. एम. जगदाळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)