शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वागतालाच इस्लामपूर पालिकेविरुध्द तक्रार

By admin | Updated: March 12, 2015 23:54 IST

गायकवाड यांनी मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय इमारतीमधील प्रांत कार्यालयास भेट दिली

इस्लामपूर : नूतन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांचे पदभार स्वीकारण्यासाठी प्रस्थान होत असताना, त्यांच्या इस्लामपूर भेटीच्यावेळी पहिल्यांदा स्वागत करुन येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर नगरपालिकेच्या कारभाराविरुध्द ३ तक्रारी केल्या. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे पालिकेविरुध्द तक्रार करून येथील कारभाराकडे त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
गायकवाड यांनी मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय इमारतीमधील प्रांत कार्यालयास भेट दिली. प्रांताधिकारी डॉ. विजयसिंह देशमुख, तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी त्यांचे स्वागत केले. अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर तेथे काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र युवक अध्यक्ष विजय पवार, शहर उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी गायकवाड यांचे स्वागत करून शहरात सुरु असलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्ते डांबरीकरणाच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी केली. तसेच एकात्मिक गृहनिर्माण सुधारणा योजनेंतर्गत बांधलेल्या २४० घरकुलांचा दर्जा निकृष्ट आहे. त्याचीही स्वतंत्रपणे चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी.
१७ जानेवारी रोजी घरकुल व व्यापारी संकुलाचा उद्घाटन कार्यक्रम शासकीय असताना निमंत्रण पत्रिकांमधून खा. राजू शेट्टींचे नाव वगळले. राष्ट्रवादीचाच कार्यक्रम, असे स्वरुप देण्यात आल्याने कार्यक़्रमाच्या खर्चाची वसुली मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, पक्षप्रतोदांकडून करण्यात यावी, अशीही मागणीही त्यांनी केली आहे. (वार्ताहर)