शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागाच्या योजनेला कोलदांडा

By admin | Updated: May 5, 2015 00:50 IST

जलयुक्त शिवारचा फज्जा : ग्रामसभा कागदोपत्रीच, लोकप्रतिनिधींची उदासीनता

तासगाव : जलयुक्त शिवार योजना हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेबाबत एक मे रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश शासन स्तरावरून देण्यात आले होते. मात्र, या योजनेला ग्रामपंचायतीतील लोकप्रतिनिधी आणि लोकांनीच कोलदांडा दाखविल्याचे चित्र आहे. अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी ग्रामसभा झाल्या नसून, बहुतांश ठिकाणी केवळ कागदोपत्रीच ग्रामसभा झालेल्या आहेत. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून एक मे रोजी ग्रामपंचायतींमार्फत विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्याचे आदेश शासन पातळीवरून देण्यात आले होते. या ग्रामसभेत शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेची माहिती ग्रामस्थांना समजावून सांगण्यात येणार होती. ही योजना अधिकाधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी, लोकांचा सहभाग वाढावा, सातत्याने भेडसावणारा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा, पाण्याच्या बचतीचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावे, याबाबत सविस्तर महत्त्व पटवून देण्यासाठी आणि योजनेची प्रभावीपणे यशस्वी अंमलबजावणी व्हावी, या हेतूने विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या पातळीवर लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि शासकीय योजनेच्याबाबतीत लोकांचा निरूत्साह यामुळे एक मे रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभांना लोकांनीच खो घातल्याचे दिसून आले. काही क्रियाशील गावांचा अपवाद वगळता, बहुतांश ग्रामपंचायतीत ग्रामसभा झाल्याचे कागदी घोडे नाचविण्यात आले. अनेक ग्रामपंचायतीत सदस्यांनीच दांडी मारल्याचे दिसून येत होते, तर बहुतांश ठिकाणी नागरिकांची पुरेशी उपस्थिती नसल्यामुळे ग्रामसभांचा केवळ प्रशासकीय सोपस्कार उरकण्यात आला. (वार्ताहर)