शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्यांचा ५ आॅक्टोबरला मुंबईत घेरावो

By admin | Updated: September 13, 2015 22:51 IST

मोहन शर्मा : कायकर्ता प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

सांगली : वीज कर्मचाऱ्यांच्या सर्वच प्रश्नांवर सरकारकडून दिरंगाई होत असून, शासनाला जाग आणण्यासाठी येत्या ५ आॅक्टोबरला मुंबईतील महावितरणचे कार्यालय असलेल्या ‘प्रकाशगड’ला घेराव घालण्याचा इशारा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष मोहन शर्मा यांनी रविवारी सांगलीत दिला.सांगलीत वर्कर्र्स फेडरेशनच्यावतीने कॉ. शाम केरकर कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन शर्मा यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आयटकचे सरचिटणीस सुकुमार दामले होते. शर्मा म्हणाले की, संघटनेने वीज मंडळाचे चार कंपन्यांत रूपांतर करण्यास विरोध केला होता. आता या कंपन्या तोट्यात असून, शासनाचा हजारो कोटींचा महसूल बुडाला आहे. एन्रॉन प्रकल्पालाही फेडरेशननेच प्रथम विरोध केला होता. तीस हजार रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम केले. राज्यातील ही बलाढ्य संघटना असून, या संघटनेतील कार्यकर्त्यांनी आपल्या संघटित ताकदीचा आता दलित, शोषित, कष्टकरी, असंघटित क्षेत्रातील तसेच कंत्राटी, रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.सुकुमार दामले म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार भांडवलदारांचे आहे. त्यामुळे ते सांगतील तसे बदल कामगार कायद्यात केले जात आहेत. फिक्कीने अशा बदलांची यादीच केंद्र सरकारला दिली आहे. त्यानुसार निर्णय घेतले जात आहेत. सरकार आता सामान्यांचे, कर्मचाऱ्यांचे राहिलेले नाही. कामगार कायदे, जमीन अधिग्रहण, कर सवलत, स्थानिक संस्थांचे खच्चीकरण आणि पर्यावरण या पाच मुद्द्यांवर सरकार भांडवलांसमोर झुकल्याचा आरोप त्यांनी केला.यावेळी महेश श्रीमंत खरमाटे, अशोक पाटील, मनोहर जाधव, सागर जगताप, जगदीश नलावडे आदी उपस्थितीत होते. स्वागत, प्रास्ताविक महेश जोतराव यांनी केले, तर आभार शिवशंकर भस्मे यांनी मानले. (प्रतिनिधी)