Sangli: चांदोली धरण निम्मे भरले, कोकरुड-रेठरे बंधारा पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 17:36 IST2025-06-21T17:35:08+5:302025-06-21T17:36:22+5:30

मोरणा धरणाच्या सांडव्यातून पाणी बाहेर  

Chandoli dam filled to 53 percent, Kokarud Rethar bandhara under water | Sangli: चांदोली धरण निम्मे भरले, कोकरुड-रेठरे बंधारा पाण्याखाली

Sangli: चांदोली धरण निम्मे भरले, कोकरुड-रेठरे बंधारा पाण्याखाली

शिराळा : शिराळा शहरास तालुक्यात पावसाच्या लहानमोठ्या सरी सुरूच आहेत. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तसेच धरण परिसरात अतिवृष्टी सुरू असल्याने चांदोली धरण ५३.४० टक्के भरले आहे. शहरासह आसपासच्या गावांना पाणीपुरवठा करणारे मोरणा धरण गुरुवारी (दि. १९) सायंकाळी सातच्या दरम्यान, तर शिवणी तलाव शुक्रवारी दुपारच्या दरम्यान भरून सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे. शिराळा पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असून, कोकरुड-रेठरे बंधारा पाण्याखाली गेला आहे.

पावसामुळे वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई तलाव, अंत्री बुद्रुक तलाव, रेठरे धरण अगोदरच भरले असून, आता मोरणा धरण गुरुवारी सायंकाळी सातच्या दरम्यान व शिवणी धरण शुक्रवारी दुपारी बाराच्या दरम्यान शंभर टक्के भरून सांडव्यांतून पाणी बाहेर पडले आहे. गिरजवडे धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने पाणीसाठा स्थिर आहे. सततच्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील निवळे, पाथरपुंज, चांदोली येथे अतिवृष्टी सुरू असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. गतवर्षी १०.४२ टीएमसी पाणीसाठा होता, तर यावर्षी १७.९९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. चांदोली धरणात ११ हजार २५० क्यूसेकने आवक, तर वीजनिर्मिती केंद्रातून १५३० क्यूसेकने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. दि. २३ मेपासून आज अखेर ४.५५ टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. शिराळा, मांगले, सागाव, कोकरूड, आरळा, चरण, वाकुर्डे, शिरशीसह तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे.

शिराळा परिसरातील तलाव व धरणातील पाणीसाठा
मोरणा धरण - १०० टक्के
करमजाई तलाव- १०० टक्के
मानकरवाडी तलाव - १०० टक्के
शिवणी तलाव - १०० टक्के
टाकवे तलाव - ७५ टक्के
रेठरे धरण - १०० टक्के
कार्वे तलाव - ३३ टक्के
गिरजवडे मध्यम प्रकल्प- ७२ टक्के
चांदोली धरण- ५२.२८ टक्के

मंडलनिहाय पडलेला पाऊस कंसात एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये
कोकरूड २०.८० (२३५.५०)
शिराळा ४ (१८३.१००)
शिरशी २९.३० (२४३.३०)
मांगले ४ (१६६.६० )
सागाव ५.८० (१५६.१०)
चरण ३७.८० (३९०.३०० )
वारणावती ७१ (५२९.००)

Web Title: Chandoli dam filled to 53 percent, Kokarud Rethar bandhara under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.