शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

रावळगुंडवाडीत चंदन जप्त

By admin | Updated: September 19, 2015 23:58 IST

पोलिसांचा छापा : दोन लाखांचा साठा हस्तगत; बाप-लेकावर गुन्हा

संख : रावळगुंडवाडी (ता. जत) येथे जत पोलिसांनी छापा टाकून २ लाख १० हजार रुपयांचा चंदनाचा साठा जप्त केला. याप्रकरणी लक्ष्मण रामाण्णा माने (वय ६०), यल्लाप्पा लक्ष्मण माने (रा. रावळगुंडवाडी) या बाप- लेकाविरुद्ध जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा साठा डाळिंबाच्या बागेत करण्यात आला होता. या घटनेतील यल्लाप्पा लक्ष्मण माने हा फरारी आहे. ही कारवाई दुपारी २ च्या दरम्यान झाली. या मोहिमेमुळे चंदन तस्करांमध्ये घबराट पसरली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी, पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रावळगुंडवाडी येथे छापा टाकला. लक्ष्मण माने यांच्या शेतामध्ये डाळिंबाच्या बागेत चंदनाचे लहान-मोठे तुकडे प्लॅस्टिक पोत्यात ठेवण्यात आले होते. तुकड्यांचे वजन ७० किलो होते. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत २ लाख १० हजार रुपये आहे. खबऱ्यामार्फत चंदन तस्कराची माहिती मिळाली होती. पोलिसांनी धडक मोहीम राबवून ही कारवाई केली. पथकामध्ये उपनिरीक्षक आर. आय. शेख, पोलीस नाईक मोहिते, घाडगे, माने, गंभीर, खोत यांनी सहभाग घेतला होता. अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे करीत आहेत. (वार्ताहर)