शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या कानाकोपऱ्यात सीसीटीव्हीची नजर

By admin | Updated: December 29, 2014 23:37 IST

आयुक्तांचे नियंत्रण : मुख्यालयात नऊ नवे कॅमेरे येणार; सुरक्षेकरिता नव्या उपाययोजना

सांगली : महापालिकेच्या कानाकोपऱ्यावर नजर ठेवण्यासाठी आता नव्याने नऊ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीचे काम सुरू झाले आहे. आयुक्तांच्या कार्यालयापासून मुख्यालय इमारतीच्या आवारातील पार्किंगपर्यंत सर्वत्र कॅमेऱ्यांचा ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे. महापालिकेत सध्या सुरक्षा रक्षकही अनेक ठिकाणी तैनात आहेत. महापालिका बॉम्बने उडविण्याची धमकी वारंवार देण्यात येते. धमकीसत्र सुरू झाल्यानंतर प्रथमच महापालिकेने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात केली. महाआघाडीच्या कालावधित तर सर्वसामान्य माणसांनाही सुरक्षा रक्षकांनी मुख्यालयात जाण्यापासून मज्जाव केला होता. ठराविक कालावधी सोडला, तर नागरिकांनी महापालिका मुख्यालयात जाण्याची सोय नव्हती. नागरिकांच्या कामापेक्षा त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांना अधिकारी, पदाधिकारी व नगरसेवकांची सुरक्षाच महत्त्वाची वाटली. त्यामुळे नागरिकांसाठी मुख्यालयाचे दरवाजे बंद झाले. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर दरवाजे पुन्हा खुले करण्यात आले, तरीही सुरक्षा रक्षकांचा गराडा कायम राहिला. सुरक्षेच्याबाबतीत महापालिका प्रशासन व याठिकाणचे पदाधिकारी अजूनही सतर्क आहेत. त्यामुळेच मुख्य प्रवेशद्वारावर दोन इमारतींच्या प्रवेशद्वाराजवळ दोन असे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. प्रशासनाने आता त्यापुढचे पाऊल टाकत महापालिकेच्या इमारतीचा कानाकोपरा सुरक्षेच्या कक्षेत घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी नव्याने नऊ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. कॅमेऱ्यातील प्रत्येक हालचालींवर आयुक्तांची नजर असणार आहे. त्यासाठी आयुक्तांच्या दालनातच नियंत्रण केंद्र उभारण्यात येणार आहे. कोणत्याही ठिकाणच्या कक्षेत काय चालू आहे, या गोष्टी त्यांना दिसणार आहेत. (प्रतिनिधी) कारभारावर वॉच कधी?कॅमेऱ्याच्या माध्यमातून महापालिकेच्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी, कारभारावर वॉच ठेवण्यासाठी सध्या कोणतीही यंत्रणा महापालिकेत नाही. विशेष लेखापरीक्षणातील ताशेरे आणि वसुलीच्या यापूर्वीच्या प्रक्रियेनंतरही कारभारात सुधारणा होऊ शकली नाही. तिजोरीची सुरक्षा अजूनही ‘रामभरोसे’च आहे. याठिकाणी वॉचइमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या वऱ्हांड्यात, आयुक्त कार्यालयात, पहिल्या मजल्यावरील तसेच तळमजल्यावरील वऱ्हांड्यात, स्थायी समिती सभागृहात, महापालिका सभागृहात तसेच इमारतीच्या बाहेरील बाजूस कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यापूर्वी महापालिकेच्या बाहेरील बाजूस व आतील बाजूस काही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्या कॅमेऱ्यांपेक्षा चांगल्या दर्जाचे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.