शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, कमी झोपेमुळे प्रतिकारशक्ती खालावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आराम करण्याने आरोग्याचे अनेक फायदे मिळत असतात. तरीही बदलत्या जीवनशैलीमुळे आराम करण्यापेक्षा धावपळीत प्रत्येकजण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : आराम करण्याने आरोग्याचे अनेक फायदे मिळत असतात. तरीही बदलत्या जीवनशैलीमुळे आराम करण्यापेक्षा धावपळीत प्रत्येकजण गुंतला आहे. १६ ते १८ तास काम करण्यामुळे झोपेसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. शरीराची झोपेची भूक अपूर्ण राहण्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे झोपेबाबत सर्वांनी सतर्क राहण्याची आवश्यक आहे.

चौकट

किमान आठ तासांच्या झोपेची आवश्यकता प्रत्येकच व्यक्तीला असते. कारण पुरेशी झोप झाल्यानंतरच मेंदूला आराम मिळतो आणि मेंदू कार्यक्षम राहू शकतो. त्यामुळे झोपेच्या वेळा सांभाळूनच कामाचे गणित आखायला हवे. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आजारांपासून दूर राहता येऊ शकते.

चौकट

अपुऱ्या झोपेचे तोटे

झोप पुरेशी होत नसेल, तर आपली स्मरणशक्ती कमी होते.

चयापचय क्रिया बिघडण्यासह वजनही वाढते

मेंदूवरदेखील याचा परिणाम होतो. परिणामी चिडचिडेपणा वाढतो. एकाग्रता राहात नाही.

रोगप्रतिकारकशक्तीवरसुद्धा याचा विपरित परिणाम होत असतो.

कोट

वेळेत झोप व वेळेत जेवण हा आरोग्याचा महत्त्वाचा मंत्र आहे. झोप पुरेशी न झाल्यास त्याचे परिणाम भोगावे लागणारच. याशिवाय रात्री उशिरा झोपून दुसऱ्यादिवशी दुपारपर्यंत झोपणेही तितकेच आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे पुरेशी व योग्यवेळी विश्रांती घ्यावी.

- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक

चौकट

रोगप्रतिकारशक्ती आरोग्याची ढाल

कोणत्याही रोगास प्रतिकार करण्याचा अंगभूत गुण म्हणजे रोगप्रतिकारशक्ती. ही शक्ती कमी असल्यास व्यक्ती लवकर आजारी पडते आणि ही शक्ती योग्य प्रमाणात असल्यास व्यक्ती लवकर आजारी पडत नाही. रोगप्रतिकारकशक्ती आहारात आणि जीवनशैलीत काही बदल करून वाढवता येते. त्यासाठी पुरेशी विश्रांती, योग्य व वेळेत आहार, व्यायाम या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

चाैकट

वयोगटानुसार झोपेचे तास

० ते ३ महिने

१४ -१७

४-११ महिने

१२-१५

१ वर्ष ते २ वर्षे

११-१४

३ ते ५ वर्षे

१०-१३

६ ते १३

९-११

१४ ते १७ वर्षे

९-११

१८ ते ६४ वर्षे

८-९

६५ ते पुढील

७-८