शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खत तस्करीप्रकरणी सूत्रधाराचा शोध सुरू

By admin | Updated: September 23, 2014 00:11 IST

जिल्हा परिषद : कर्नाटकात खत पळविले

सांगली : जिल्ह्यातील सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीच्या खताची परस्पर आॅर्डर देऊन खत पळविल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी रघुनाथ भोसले यांनी दिली. खत नोंदणीसाठी ज्या क्रमांकावरून दूरध्वनी आला, तो नक्की कोणाचा आहे, याचाही तपास करण्यात येणार असून, त्यानंतर सूत्रधाराचे नाव उघड होणार आहे.दोन दिवसांपूर्वी दोनशे पोती युरिया आणि ८० किलो १८:१८:१८ विद्राव्य खत एका मुख्य खत विक्रेत्याच्या माध्यमातून कर्नाटकात घेऊन जाणारा ट्रक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खटाव (ता. मिरज) येथे पकडला होता. ट्रकचालकाने सांगलीतील रेल्वेस्थानकावरून खत भरले होते. संबंधित ट्रक चालकाकडे खटाव येथील न्यू सोमेश्वर कृषी सेवा केंद्रासाठी खत देण्याचे बिल होते. खटावमध्ये ट्रक गेल्यानंतर सोमेश्वर कृषी सेवा केंद्राच्या मालकांनी संबंधित खत आपले नसल्याचे सांगितले. तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची कल्पना दिली. यामध्ये काही तरी गोलमाल असल्याचे लक्षात येताच कृषी विकास अधिकारी भोसले यांनी संबंधित कृषी सेवा केंद्रचालकास ट्रक तेथेच थांबवून ठेवण्याची सूचना दिली. त्यानंतर खताची तपासणी करण्यात आली. यावेळी संबंधित खत कर्नाटकात जात असल्याचे तपासणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ते खत कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील एका गोदामात ठेवण्यात आले आहे. ज्या क्रमांकावरून दूरध्वनी आला होता, त्याचे नाव उघड होण्यासाठीच गुन्हा दाखल करणार असल्याचे भोसले यांनी सांगितले. (वार्ताहर)