शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कारची डंपरला धडक, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू; विजापूर-गुहागर राज्य मार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 09:47 IST

गाणगापूरला दत्त देवाचे दर्शन घेऊन विजयपुर मार्गे जतकडे येत असताना हा अपघात रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला.

जत : विजापूर-गुहागर राज्य मार्गावर जत पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अमृतवाडी फाट्याजवळ स्वीप्ट कारने समोरून येणाऱ्या ट्रकला चुकविण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील पाच जण मयत झाले. गाणगापूरला दत्त देवाचे दर्शन घेऊन विजयपुर मार्गे जतकडे येत असताना हा अपघात रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला.

या अपघातात चालक दत्ता हरीबा चव्हाण (वय 40रा जत), नामदेव पुनाप्पा सावंत 65, पदमिनी नामदेव सावंत 60, श्लोक आकाशदिप सावंत वय 8 मयुरी आकाशदिप सावंत वय 38 सर्व रा. मुळ राहणार शेंगाव तर सध्या रा. जत)मध्ये राहण्यास आहेत. हे चौघे जण एकाच कुटुंबातील असुन आजी, आजोबा सून व नातू याचे मयत झाले आहेत. या अपघातात वरद सावंत हा वय दहा वर्ष हा गंभीर जखमी झाला आहे.

मूळ गाव शेगाव ( ता. जत)  येथील चारजण रहिवाशी आहेत. मात्र सध्या जत येथील एम आय डी सी जवळ रहात आहेत. अपघात घडताच प्रथम दर्शनी दोघेजण जखमी अवस्थेत असलेल्या आई मयुरी सावंत व मुलगा वरद सावंत यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. वरद यास तातडीने पुढील उपचारासाठी सांगलीला नेण्यात आले. भाडोत्री कार घेऊन ते देवदर्शनासाठी गेले होते. चालक म्हणुन दत्ता चव्हाण एकाच कुटुंबातील चारजण रहिवाशी आहेत. तर यात एक चालक ही मयत झाला आहे. असे मिळुन पाच जण मयत झाले आहेत. 

या अपघातात चालक दत्ता चव्हाण , मयुरी सावंत हे महेश झाले आहेत त्याचबरोबरआजी, आजोबा सून व नातू हे त्यांचे मयत झाले आहेत. या अपघातात वरद सावंत हा वय दहा वर्ष हा गंभीर जखमी झाला आहे. त्यास सांगलीला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. चार जणांचे मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी आणण्यात आले. चालक दत्ता हा जखमी होता. त्यास उपचारांसाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. मोठा अपघात घडल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. जत ग्रामीण रुग्णालयात देखील मोठी गर्दी झाली होती. पोलिस निरीक्षक राजेश रामआघरे यांनी तातडीने भेट देऊन घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :AccidentअपघातSangliसांगलीDeathमृत्यू