शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
5
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
6
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
7
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
8
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
9
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
10
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
11
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
12
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
13
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
14
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
15
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
16
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
17
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
18
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
19
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
20
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील वायफळे येथील उरुसात मानाच्या बैलगाड्याला अपघात, पळताना बैल घसरून पडल्याने फरफटत गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 18:40 IST

या गाड्याला सलग दुसऱ्या वर्षी अपघात

तासगाव : तासगाव तालुक्यातील वायफळे येथील उरुसास आजपासून सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने मानाचा बैलगाडा पळवला जातो. या गाड्याला सलग दुसऱ्या वर्षी अपघात झाला. गाडा पळवत असताना एक बैल घसरून पडला. तो १०० ते ११० फूट फरफटत गेला. याचवेळी गाड्यातील लोकांनी बाहेर उड्या मारल्या. या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला आहे. तर फरफटत गेलेल्या बैल जखम झाली आहे. तत्पूर्वी बैल गाड्यासह रस्ता सोडून दुसरीकडे गेल्याने काही दुचाकींचेही नुकसान झाले आहे.वायफळे येथील हिंदू-मुस्लीम बांधव एकत्रित येऊन पीर गैबीसाहेब यांचा उरुस उत्साहात साजरा करतात. त्यानिमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. गंध व पीर गैबीसाहेब यांचा नैवेद्य पार पडला. आज रात्री तमाशाही होत आहे. तत्पूर्वी मंगळवारी सायंकाळी गावातील प्रमुख रस्त्यावरून मानाचा गाडा पळवण्यात आला.

हा गाडा तलाठी कार्यालयासमोर आल्यानंतर गाड्याचे बैल भरकटले. ते रस्ता सोडून दुसरीकडेच गेले. तेथील दुचाकी रस्त्यावर पडल्या. या दुचाकींचे थोडेफार नुकसान झाले. त्यानंतर हा गाडा पळत बसस्थानकाच्या दिशेने आणण्यात आला. बसस्थानकावरून तो पुढे जात असताना अचानक एक बैल कोसळला. इतर तीन बैलांनी त्याला जवळजवळ १०० फूट फरफटत नेले. याचवेळी गाड्यातील लोकांनी खाली उड्या मारल्या. यामध्ये बैल व एक जण जखमी झाला आहे.रस्त्याच्या दुतर्फा गर्दीया गाड्याचा मान कडेमळा येथील भाविकांना आहे. त्यानुसार सायंकाळी हा गाडा सजवून गावात आणण्यात आला. सायंकाळी चार बैल जुंपलेला हा गाडा प्रमुख रस्त्यावरून सोडण्यात आला. गाड्याचा पुढे काही जण पळत होते. गाड्याचा आडवे कोणी येऊ नये, याची काळजी घेतली जात होती. हा गाडा पाहायला रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :Sangliसांगली