शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्प प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST

सामान्य व निराधार महिलांना दिलासा देणारे निर्णय अर्थसंकल्पात दिसत नाहीत. कुटुंबात एकुलत्या कमावत्या महिलांचा विचार महिला अर्थमंत्र्यांनी केलेला नाही. ...

सामान्य व निराधार महिलांना दिलासा देणारे निर्णय अर्थसंकल्पात दिसत नाहीत. कुटुंबात एकुलत्या कमावत्या महिलांचा विचार महिला अर्थमंत्र्यांनी केलेला नाही. वाढीव वीजबिले, पाणीबिले, वाढती महागाई यामुळे पिचलेल्या महिलांचा विचार सरकार कधी करणार, हा माझा प्रश्न आहे.

- दीपाली जाधव, गृहिणी, मिरज

पेट्रोलवर अडीच रुपये आणि डिझेलवर चार रुपये कृषी अधिभार अंदाजपत्रकात लावला आहे. मात्र तो थेट इंधनाच्या दरावर परिणाम करणारा नाही. एक्साईज ड्युटीमधून तो वळता केला जाणार आहे. त्यामुळे इंधन दरवाढीपासून ग्राहकांची तूर्त सुटका नाही.

- सुरेश पाटील, पेट्रोल पंपचालक

जीएसटीमधून दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. त्याऐवजी सरकारने कर स्लॅबमध्ये बदल नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जीएसटी मानगुटीवर राहणारच हे स्पष्ट झाले आहे. लॉकडाऊन काळात नुकसानीत गेलेल्या व्यावसायिकांची बजेटने निराशा केली आहे.

- विकास केरीपाळे, किराणा व्यावसायिक

खासगी नोकरदारांना वाढती महागाई सतावते आहे, त्यावर अर्थमंत्र्यांनी भाष्य केलेले नाही. लॉकडाऊनमध्ये कंपन्यांनी वेतन कापले, काहींना कामावरूनही कमी केले. त्यांचाही विचार केलेला नाही. आरोग्य क्षेत्रात सुधारणांसाठी केलेली तरतूद मात्र गरिबांना दिलासा देणारी आहे.

- विनोद कोपार्डे, खासगी नोकरदार

बसस्थानकावर...

पेट्रोल कमी झाले काय ते सांगा!

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराच्या समस्येवर बसस्थानकावर चर्चा रंगल्या होत्या. तेलाच्या किमती कमी केल्या काय, हा अनेकांचा प्रश्न होता. अर्थसंकल्पामध्ये काहीही जाहीर झाले तरी आमचा महिन्याचा खर्च कमी होणार नाही, हे पक्के असल्याची निराशादायी प्रतिक्रियादेखील व्यक्त होत होती. बसची वाट बघत बसलेल्या कॉलेज तरुणांचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्‌सच्या किमतींकडे लक्ष होते. मोबाईलवर येणाऱ्या अपडेटवर बोट ठेवून प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.

रेल्वेस्थानकावर

रेल्वेस्थानकावर शुकशुकाट होता, प्रवासी नव्हते, पण अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे होते. रेल्वेला काय दिले आणि काय नाही याची उत्सुकता होती. ‘मॅडमने इस साल भी सांगली-मिरज को कुछ नही दिया’, अशी हताश प्रतिक्रिया काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

------------