शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

पावणेदोन कोटींच्या विनानिविदा कामांना ‘ब्रेक’

By admin | Updated: June 7, 2015 00:34 IST

स्थायी समितीचा निर्णय : दलित वस्ती सुधार समितीला दणका; कामे निविदा पद्धतीनेच करण्याचा ठराव

सांगली : महापालिकेच्या दलित वस्ती सुधार समितीने प्रस्तावित केलेल्या पावणेदोन कोटी रुपयांच्या विनानिविदा कामांना शनिवारी स्थायी समिती सभेने ब्रेक दिला. ही सर्व कामे रितसर निविदा पद्धतीनेच करण्याचा ठराव स्थायी सभेत करण्यात आल्यामुळे, दलित वस्ती सुधार समितीला मोठा दणका बसला आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत पावणेदोन कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. शासनाकडून आलेल्या निधीतून कामे सुचविताना दलितवस्ती सुधार समितीच्या बैठकीत १८ कामे विनानिविदा पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता. सुशिक्षित बेरोजगार सोसायट्या, मजूर सोसायट्यांकडून, तर काही कामे अन्य ठेकेदारांकडून करण्यात येणार होती. १८ पैकी १० कामे विनानिविदा पद्धतीने करण्याचा प्रस्ताव दलित वस्ती सुधार समितीकडून स्थायी समितीकडे आला होता. स्थायी सदस्यांनी विनानिविदा कामांना विरोध दर्शविला. दलितवस्ती सुधार योजनेची सर्व कामे रितसर निविदा पद्धतीने करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे सभापती संजय मेंढे यांनी विनानिविदा कामांचा प्रस्ताव धुडकावून लावत निविदा पद्धतीनेच सर्व कामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. रस्ते, गटारी, मुरुमीकरण या स्वरुपाची ही कामे होती. प्रशासनाने सुरुवातीलाच ही सर्व कामे निविदा पद्धतीनेच करावीत, अशी टिपणी दिली होती. तरीही या टिपणीचा विचार न करता सुधार समितीने मर्जीतल्या ठेकेदारांना कामे देण्याचा घाट घातला होता. स्थायी समिती सभेने सुधार समितीचे मनसुबे उधळून लावले. महापालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने करण्याचा डोस सत्ताधारी नेते मदन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी दिला दिला होता. त्यामुळे स्थायी समितीने याच गोष्टीचा दाखला देत विनानिविदा कामांना ‘ब्रेक’ लावला. (प्रतिनिधी) मोफत अंत्यविधी साहित्य योजनेस मुदतवाढ महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या मोफत अंत्यविधी साहित्य पुरवठा योजनेंतर्गत नियुक्त ठेकेदाराची मुदत मार्चमध्येच संपली आहे. एप्रिलपासून त्यांना मुदतवाढ मिळाली नव्हती. स्थायी समिती सभेत एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी ठेकेदाराला मुदतवाढ दिली आहे. याच महिन्यात योजनेसाठी नव्याने निविदा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला.