शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीसाठी दोघांचे अपहरण

By admin | Updated: September 15, 2015 00:46 IST

सांगलीतील घटना : बेदम मारहाण; गुंड म्हमद्या नदाफ टोळीविरुद्ध गुन्हा

सांगली : दोन लाखाच्या खंडणीसाठी अंकुश फोंडे (वय २४) व त्याचा मित्र गोरखनाथ माने (२४, रा. पाटणे प्लॉट, अभयनगर, सांगली) या दोघांचे गुंड म्हमद्या नदाफ टोळीने रविवारी रात्री अपहरण करून बेदम मारहाण केली. खंडणीची रक्कम न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या खिशातील सहा हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी म्हमद्यासह सहाजणांविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात अपहरण, मारहाण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये म्हमद्या नदाफ, सागर शेंडगे, अक्षय पाटील, अक्षय गायकवाड, मंगेश व आरीफ (पूर्ण नाव निष्पन्न नाही, सर्व रा. संजयनगर) यांचा समावेश आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना केले आहे. म्हमद्याने सहा महिन्यांपूर्वी गोरखनाथ माने याच्याकडे दोन लाखाच्या खंडणीची मागणी केली होती. मानेने खंडणी देण्यास नकार दिला होता. तेव्हापासून म्हमद्या व त्याचे साथीदार त्यास खंडणीसाठी धमकावत होते. अंकुश फोंडे हा गोरखनाथचा मित्र आहे. म्हमद्याने रविवारी रात्री अंकुशच्या मोबाईलवर संपर्क साधून ‘तुझ्या मित्राकडून आम्हाला दोन लाखांची खंडणी घेऊन दे नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यास बोलावून घेतले. तो आल्यानंतर म्हमद्या व त्याच्या साथीदारांनी त्यास दुचाकीवरून तात्यासाहेब मळ्यात नेले. तिथे कोयत्याचा धाक दाखवून बेदम मारहाण केली. म्हमद्याने अंकुशला गोरखशी संपर्क साधून त्यास संजयनगर येथील हनुमान मंदिराजवळ येण्यास सांगितले. तोही आला. त्यानंतर म्हमद्याने पुन्हा या दोघांना कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. त्यांच्या खिशातील सहा हजार दोनशे रुपये काढून घेतले. रात्रभर या दोघांना ओलीस ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न केला; पण या दोघांनी त्यांच्या तावडीतून सुटका करून थेट पोलीस ठाणे गाठले. म्हमद्या पुन्हा चर्चेत खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, अपहरण, हत्यार बाळगणे, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेला म्हमद्या नदाफ पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो जामिनावर बाहेर आहे. यापूर्वी त्याच्याविरुद्ध कुपवाड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. संजयनगर, अभयनगर, शिंदे मळा याठिकाणी त्याची दहशत आहे.