शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

पावसाविना जिल्ह्यातला बेंदूर कोरडाच!

By admin | Updated: July 30, 2015 00:24 IST

शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण : सण आणि निसर्गाचे गणित बिघडल्याचे चित्र...

सहदेव खोत -पुनवत -बेंदूर सण म्हणजे सर्वत्र पाऊस, हे परंपरागत समीकरण. या सणावेळी सर्वत्र नदी, नाले, ओढे दुथडी भरुन वाहत असतात. ग्रामीण भागात तर या सणाच्यानिमित्ताने आनंदाला उधाण आलेले असते. परंतु यावर्षी जिकडे-तिकडे कडक ऊन अन् कोरडी ठणठणीत शेती, यामुळे शेतकऱ्यांच्या या सणाच्या आनंदावर यावर्षी जणू विरजणंच पडले आहे. बैलांना नदीवरून धुऊन आणणे, त्यांना सजवणे, वर्षाचे अन्न देणाऱ्या काळ्या आईला (शेतीला) चिखलवाटा तुडवीत पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करणे, शेतात पिंपळाच्या पानांचे तोरण वाहणे, असे बरेच काही या सणाला असते. पण यंदाच्या बेंदरात पाऊस नसल्याने, तसे आनंददायी चित्र पाहायला मिळालेच नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात बेंदूर सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भर पावसाळ्यात बेंदराचा सण येतो. दरवर्षी बेंदराला धुवाँधार पाऊस असतो. नद्यांना हमखास पूर येतो. ग्रामीण भागात या पुराला बेंदरी पूर म्हणतात. अर्थात पुराने हानी होत असली तरी, या बेंदरी पुरामुळे अनेकांचे काही फायदेही होत असतात. शेती पिकविण्यास शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या सर्ज्या-राज्याच्या जोडीला अंघोळ घालून छान सजवलं जातं. त्यांना अंबील, घुगऱ्या, हुंडे, नैवेद्य खायला घातला जातो. शेतकरी या दिवशी आपल्या बैलांप्रती व शेताप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.मात्र यावर्षी बेंदूर सण व पाऊस यांचे गणितच बिघडल्याने शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना या सणाचा आनंदच घेता आला नाही. ना शेतात पाणी ना चिखल, ना नदी-नाल्यांना पूर. या परिस्थितीमुळे बेंदूर सणातील उत्साहच यंदा निघून गेला. एकंदरीत बदलत्या काळात बेंदूर आणि पाऊस यांचे समीकरण बिघडल्याने या सणातला नेहमीचा आनंदच हरविला आहे.