सांगलीत नाल्यामध्ये आढळला मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:46 IST2026-01-13T15:45:58+5:302026-01-13T15:46:31+5:30

पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह सिव्हिलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला

Body found in drain in Sangli, Investigation started by the police | सांगलीत नाल्यामध्ये आढळला मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरु

सांगलीत नाल्यामध्ये आढळला मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरु

सांगली : येथील सोनार गल्लीजवळील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सोमवारी आढळून आला. सायंकाळी उशिरापर्यंत मृत व्यक्तीची ओळख पटली नव्हती.

नाल्यात मृतदेह आढळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ सांगली शहर पोलिस ठाण्यास कळवले. पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकास पाचारण केले. स्पेशल रेस्क्यू फोर्स पथकाने नाल्यातून मृतदेह बाहेर काढला.

मृत व्यक्तीचे अंदाजे वय ५० ते ६० वर्षे आहे. शरीर कुजलेल्या अवस्थेत होते. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह सिव्हिलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title : सांगली में नाले में सड़ा हुआ शव मिला; पुलिस जांच जारी

Web Summary : सांगली के सोनार गली के पास एक नाले में एक अज्ञात, सड़ा हुआ शव मिला। पुलिस को सतर्क किया गया और एक बचाव दल ने शव को निकाला। मृतक की उम्र 50-60 वर्ष होने का अनुमान है। पुलिस जांच कर रही है, शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया गया है।

Web Title : Decomposed Body Found in Sangli Drain; Police Investigate

Web Summary : An unidentified, decomposed body was discovered in a drain near Sonar Galli, Sangli. Police were alerted and a rescue team retrieved the body. The deceased is estimated to be 50-60 years old. The body has been sent for autopsy as police investigate.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.